Highlights of India vs England 5th Test in Dharmshala: Team India Was 83 Runs Behind To The England | Cricket news Marathi  Twitter
क्रीडा

IND vs ENG 5th Test Highlights: बॅझबॉलला उत्तर बॅझबॉलनेच! रोहित अन् जयस्वालकडून इंग्लिश गोलंदाजांची धुलाई

India vs England 5th Test Match Day 1 Highlight in Marathi: भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना धरमशालेतील मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs England 5th Test, Day 1 Highlights:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना धरमशालेतील मैदानावर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान इंग्लंडने केलेल्या २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने १ गडी बाद १३५ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारतीय संघा ८३ धावांनी पिछाडीवर आहे.

भारतीय संघाची दमदार सुरुवात..

या डावात इंग्लंडने केलेल्या २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जयस्वाल आक्रमक फलंदाजी करताना ५७ धावा चोपल्या. मात्र पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात तो यष्टीचीत होऊन माघारी परतला.

त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शुभमन गिलने भारतीय संघासोबत मिळून डाव सांभाळला. जयस्वाल बाद झाल्यानंतर रोहितने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत भारतीय संघाने ३० षटकअखेर १ गडी बाद १३५ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ५७ धावांवर नाबाद आहे. तर शुभमन गिल २६ धावांवर नाबाद आहे. (Cricket news in marathi)

इंग्लंडने केल्या २१८ धावा. ..

या डावात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २१८ धावांवर संपुष्टात आला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने २९, जो रुटने २६ आणि बेन फोक्सने २४ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ५, आर अश्विनने ४ आणि रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

इंग्लंड: जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, मार्क वुड शोएब बशीर, जेम्स अँडरसन.

भारतीय संघ: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

SCROLL FOR NEXT