Shubman Gill records saam tv
Sports

India Vs England : शुभमन गिल ठरला नंबर १ कॅप्टन; सुनील गावसकर, विराट कोहलीलाही टाकलं मागे

Shubman Gill No 1 Indian Captain : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलनं ओव्हल कसोटीत ११ धावा करताच महान फलंदाज सुनील गावसकर यांचा ४६ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला. गावसकरच नव्हे तर, क्वाइव्ह लॉयड यांचाही विक्रम मोडीत काढला.

Nandkumar Joshi

  • शुभमन गिलची विक्रमाला गवसणी

  • एकाच कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

  • सुनील गावसकर, विराट कोहलीला टाकलं मागे

  • डॉन ब्रॅडमन यांचाही विक्रम मोडण्याची शक्यता

भारताचा कर्णधार शुभमन गिल सध्या खोऱ्यानं धावा ओढतोय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो धावांची बरसात करतोय. नवनवीन विक्रमांनाही तो गवसणी घालतोय. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशीही त्यानं नवं शिखर गाठलंय. एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्यानं याबाबतीत विराट कोहलीलाही मागे टाकलंय. विराट कोहलीनं २०१६ मध्ये ६५५ धावा केल्या होत्या.

युवा कर्णधार शुभमन गिलनं ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावातच क्रिकेटमधील दोन दिग्गजांना मागे टाकलं आहे. गॅरी सोबर्स आणि सुनील गावसकर यांचा विक्रम त्यानं मोडीत काढलाय. ओव्हलच्या मैदानात फलंदाजी करताना दोन धावा काढताच गिल यानं गॅरी सोबर्स यांना मागं टाकलं. तर ११ धावा केल्यानंतर सुनील गावसकर यांना मागे टाकत भारताचा क्रमांक एकचा कर्णधार ठरला आहे.

शुभमन गिलनं ११ धावा केल्यानंतर एका कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो नंबर १ भारतीय कर्णधार ठरलाय. सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध एका कसोटी मालिकेत ७३२ धावा केल्या होत्या. आता गिल हा अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. इतकेच नाही तर, गिलने SENA देशांमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा यशस्वी कर्णधार होण्याचा मानही मिळवला आहे.

शुभमन गिल आणखी विक्रम करणार

शुभमन गिलच्या नावावर आणखी दोन विक्रम होण्याची शक्यता आहे. सुनील गावसकर यांनी एका मालिकेत ७७४ धावा केल्या होत्या. आता शुभमन गिल हा या विक्रमाला गवसणी घालण्यापासून काहीच धावा दूर आहे. जर गिलने ८११ धावा केल्या तर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकेल. ब्रॅडमन यांच्या नावावर एकाच मालिकेत इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. हा विक्रम मागील ९० वर्षांपासून कायम आहे. आता गिल हा रेकॉर्ड मोडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT