Ind vs Eng Test Match Day 2 Updates SAAM TV
Sports

Ind vs Eng Test : जडेजाच्या फिरकीवर इंग्लंडची गिरकी, ३५३ धावांवर डाव गुंडाळला

Ind vs Eng Test Match Day 2 Updates : भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजानं आपल्या फिरकीवर ब्रिटिश फलंदाजांना गिरकी घ्यायला लावली. जडेजानं ३२.५ षटकांत ६७ धावांच्या बदल्यात ४ गडी गारद केले.

Nandkumar Joshi

India vs England 4th Test Day 2 Update :

पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजानं आपल्या फिरकीवर ब्रिटिश फलंदाजांना गिरकी घ्यायला लावली. जडेजानं ३२.५ षटकांत ६७ धावांच्या बदल्यात ४ गडी गारद केले.

इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर संपुष्टात आणला. जडेजाने चार गडी बाद केले. विशेषतः भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरलेल्या ओली रॉबिन्सन आणि शोएब बशिर यांना बाद करण्यात तो यशस्वी ठरला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रॉबिन्सनने जो रूटच्या साथीने १०२ धावांची भागीदारी रचली. मात्र, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात रोहित शर्माने जडेजाकडे चेंडू दिला. जडेजानंही विश्वास सार्थ ठरवत आपल्या फिरकीच्या जाळ्यात रॉबिन्सनला अडकवले. त्यानंतर शोएब बशिरची शिकार केली. त्याला खातंही उघडू दिलं नाही. त्यानंतर इंग्लंड फलंदाजी सावरलीच नाही.

रांची कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला त्यावेळी रूट आणि रॉबिन्सन चांगल्या लयीत होते. भारतीय गोलंदाजांना कोणत्याही परिस्थितीत विकेट हवी होती. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मानं नव्या चेंडूनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवा चेंडू रवींद्र जडेजाच्या हाती दिला. जादुई फिरकीनं जडेजानं रॉबिन्सन आणि बशीरला बाद केले. त्यानंतर जेम्स अँडरसनची विकेट घेत इंग्लंडच्या डावाचा शेवट केला. इंग्लंडचे अखेरचे तीन फलंदाज जडेजाने तंबूत धाडले.

जो रूटच्या नाबाद १२२ धावा

भारताविरुद्ध मागील तीन कसोटी सामन्यात फलंदाजीत अपयशी ठरलेला जो रूट रांची कसोटीत चमकला. रूट शेवटपर्यंत मैदानात होता. त्याने नाबाद १२२ धावा केल्या. ओली रॉबिन्सनच्या साथीने त्याने शतकी भागिदारी केली. या दोघांच्या व्यतिरिक्त बेन फोक्स याने ४७ धावा केल्या.

दरम्यान, भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अँडरसनने त्याला अवघ्या २ धावांवर बाद केले. लंचपर्यंत भारताच्या १ बाद ३४ धावा झाल्या आहेत. यशस्वी जयस्वाल २७ धावांवर खेळत आहे. तर शुभमन गिल हा ४ धावांवर खेळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT