Akash Deep, India vs England 4th Test Updates BCCI /X
Sports

India vs England : पदार्पणातच आकाश दीपचा रांचीमध्ये तडाखा, इंग्लंडचा कणा मोडला; तिघांना केलं गारद

Team India Playing 11 : रांची कसोटीत भारतीय संघात केवळ एक बदल पाहायला मिळाला. आकाश दीप याला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली.

Nandkumar Joshi

Akash Deep, India vs England 4th Test Updates :

भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची येथे आजपासून चौथा कसोटी सामना सुरू झाला आहे. या कसोटी सामन्यात आकाश दीप यानं पदार्पण केलं आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय आकाश दीप यानं सपशेल चुकीचा ठरवला. त्यानं इंग्लंडचे सुरुवातीचे तिन्ही फलंदाज तंबूत धाडले. (Latest News)

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्यातील चौथा कसोटी सामना रांचीमध्ये आजपासून सुरू झाला आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या आकाश दीप याने इंग्लंडचे तिन्ही फलंदाज माघारी धाडले आहेत.

इंग्लंडच्या (England Test Team) डावाची सुरुवात जॅक क्राउली आणि बेन डकेट या दोघांनी केली. अत्यंत सावधपणे खेळणाऱ्या डकेटला ११ धावांवर आकाश दीपने बाद केले. ध्रुव जुरेल याने त्याचा झेल घेतला. डकेट बाद झाला त्यावेळी इंग्लंडच्या ४७ धावा होत्या. त्यानंतर आलेल्या ओली पोपला आकाश दीपनेच शून्यावर बाद केले.

सलामीचा फलंदाज आणि अत्यंत सावधपणे खेळणाऱ्या क्राउलीचा आकाश दीपने त्रिफळा उडवला. ४२ धावा करून क्राउली बाद झाला.

राजकोट कसोटी (Rajkot Test) जिंकणाऱ्या भारतीय संघात रांची कसोटीत केवळ एक बदल पाहायला मिळाला. आकाश दीप याला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. भारताकडून (Team India) कसोटी क्रिकेट खेळणारा तो ३१३ वा खेळाडू ठरला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आकाश दीपला टेस्ट कॅप दिली. २७ वर्षीय आकाश दीप मूळचा बिहारच्या डेहरी येथील राहणारा आहे. मात्र, तो बंगालकडून खेळतो.

भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नाही. त्यामुळे त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये आकाश दीपला संधी देण्यात आली. बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.

आकाश दीपची कामगिरी

आकाश दीप याने २०१९ मध्ये प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी २० मध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतो. आतापर्यंत २०२२ आणि २०२३ या दोन मोसमात तो खेळतो. ७ सामन्यांत त्याने ६ गडी बाद केले आहेत.

आकाशची गोलंदाजीतील कामगिरी

३० प्रथम श्रेणी सामन्यात १०४ विकेट

२८ लिस्ट ए सामन्यांत ४२ विकेट

४१ टी - २० सामन्यांत ४८ विकेट

रांची टेस्टमध्ये भारतीय संघाची प्लेइंग ११

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

SCROLL FOR NEXT