yashasvi jaiswal twitter/BCCI
Sports

IND vs ENG 2nd Test Day 1: जयस्वालची द्विशतकाकडे 'यशस्वी' वाटचाल! पहिल्या दिवशी टीम इंडिया मजबूत स्थितीत

India vs England 2nd Test: विशाखापट्टनमच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG 2nd Test Day 1 Highlights:

विशाखापट्टनमच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाने स्कोअरबोर्डवर ६ गडी बाद ३३६ धावा लावल्या आहेत.

यशस्वी जयस्वाल चमकला..

फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या खेळपट्टीवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती.

दोघांनी मिळून ४० धावा जोडल्या. त्यानंतर भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. रोहित शर्मा अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या गिलने कमबॅक करत मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेम्स अँडरसनने त्याला ३४ धावांवर माघारी धाडलं.

मध्यक्रमातील फलंदाज फ्लॉप..

शुभमन गिलने एक बाजू धरुन ठेवली असताना त्याला इतर कुठल्याच फलंदाजाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. जयस्वालने १५१ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं . तर दुसरी फलंदाज येण्या- जाण्याचं सत्र सुरुच होतं. श्रेयस अय्यर २७, रजत पाटीदार ३२, अक्षर पटेल २७ आणि केएस भरत १७ धावा करत माघारी परतला. (Cricket news in marathi)

पहिल्या दिवसाखेर यशस्वी जयस्वाल २५७ चेंडूंचा सामना करुन १७९ धावांवर नाबाद आहे. त्याने आतापर्यंत १७ चौकार आणि ५ षटकार मारले आहेत. तर आर अश्विन ५ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ६ गडी बाद ३३६ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

SCROLL FOR NEXT