rohit sharma twitter
Sports

IND vs ENG 2nd ODI: ना पाऊस, ना वादळ; या कारणामुळे थांबवावा लागला भारत- इंग्लंड दुसरा वनडे सामना

IND vs ENG Match Stopped Reason: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना काही मिनिटे थांबवावा लागला होता. नेमकं कारण काय?

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनेड सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय सार्थ ठरवत इंग्लंडच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि संघाची धावसंख्या ३०० पार पोहोचवली. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनीही दमदार सुरुवात केली होती. मात्र ६.१ षटकानंतर सामना थांबवावा लागला. नेमकं कारण काय? जाणून घ्या.

सामना थांबण्याचं नेमकं कारण काय?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंजचा डाव ३०४ डावांवर आटोपला.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३०५ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाचा फलंदाजीक्रम पाहता, हे आव्हान भारतीय संघासाठी फार मोठं नव्हतं. भारताकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना इंग्लंडकडून सातवे षटक टाकण्यासाठी साकीब महमूद गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्या चेंडूवर गिलने १ धाव घेतली. मात्र त्यानंतर स्टेडियममध्ये असलेल्या फ्लड लाईटमध्ये तांत्रिक बिघाड जाणवला. त्यामुळे सामना थांबवावा लागला.

त्यानंतर रोहित आणि गिलने मैदान सोडून डगआऊटमध्ये जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. दरम्यान काही मिनिटं हा सामना थांबूनच होता. त्यानंतर पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात झाली.

इंग्लंडने केल्या ३०४ धावा

इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. इंग्लंडकडून फिल सॉल्ट आणि बेन डकेटने ८१ धावांची सलामी दिली. इंग्लंडकडू जो रुटने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. तर बेन डकेटने ६५, लियाम लिविंगस्टनने ४१, आणि फिल सॉल्टने २६ धावांची खेळी केली. इंग्लंडचा डाव ३०४ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT