r ashwin twitter
Sports

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

India vs Bangladesh 1st Test Live Score: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा डाव आटोपला आहे.

Ankush Dhavre

IND vs BAN 1st Test Live Score: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली. मात्र या जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही. भारतीय संघाला १४ धावांवर पहिला धक्का बसला. रोहित शर्मा ६ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर शुभमन गिलही खातं ही न उघडता माघारी परतला. या डावात विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराटही ६ धावा करत तंबूत परतला. या तिन्ही फलंदाजांना बांगलादेशचा २४ वर्षीय युवा गोलंदाज हसन मेहमूदने पॅव्हेलियनची वाट दाखवली.

सुरुवातीला ३ मोठे धक्के बसल्यानंतर रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वालने मिळून भारताचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. यासह भारताला सामन्यात कमबॅक करुन दिलं. यशस्वी जयस्वालने ५६ धावांची खेळी केली. तर रिषभ पंत ३९ धावा करत तंबूत परतला. या सामन्यासाठी संधी देण्यात आलेल्या केएल राहुललाही संधीचा फायदा घेता आला नाही. तो अवघ्या १६ धावा करु शकला.

जडेजा -अश्विनची रेकॉर्डब्रेक भागीदारी

भारतीय संघाला १४४ धावांवर ६ मोठे धक्के बसले होते. इथून बांगलादेशने भारताचा डाव जवळजवळ गुंडाळला होता. मात्र रविंद्र जडेजा आणि आर अश्विनने मिळून भारतीय संघाला ३०० पार पोहचवलं. दोघांनी मिळून रेकॉर्डब्रेक पार्टनरशिप केली.

अश्विनने पहिल्याच दिवशी आपलं शतक पूर्ण केलं. त्याने ११३ धावा चोपल्या. तर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच जडेजाला शतक साजरं करण्याची संधी होती. मात्र तो ८६ धावांवर माघारी परतला. भारतीय संघाचा डाव ९१.२ षटकात ३७६ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT