team india twitter
Sports

IND vs BAN, Warm Up Match: पहिला पेपर पास! टीम इंडियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

India vs Bangladesh, Practice Match: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याचा थरार पार पडला.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सराव सामना बांगलादेशविरुद्ध पार पडला. तब्बल १७ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला रिषभ पंत पहिल्यांदाच भारतीय संघासाठी खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३२ चेंडूंचा सामना करत ५३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार ठोकले. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला अवघ्या १२० धावा करता आल्या.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. भारतीय संघाकडून अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात बांगलादेशला धक्का दिला. या सामन्यात त्याने ३ षटकं टाकली. यादरम्यान त्याने १२ धावा खर्च करत २ गडी बाद केले. अर्शदीप सिंगसह हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

बांगलादेशकडून फलंदाजी करताना कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेशकडून महमदुल्लाहने ४० धावांची खेळी केली. तर शाकिब अल हसनने २८ धावांचे योगदान दिले. यासह तंजिद हसनने १७ धावांचे योगदान दिले.

भारतीय फलंदाज चमकले

भारतीय फलंदाजांनी या सामन्यात शानदार फलंदाजी केली. भारतीय संघाकडून रिषभ पंतने ५३ धावांची शानदार खेळी करत प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. तर संजू सॅमसन डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला. मात्र त्याला केवळ १ धाव करता आली. शेवटी सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांनी शानदार खेळी केली. या शानदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर १८२ धावांपर्यंत मजल मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT