IND vs BAN, Pitch Report: टॉस ठरणार बॉस! बांगलादेशला हरवण्यासाठी टीम इंडियाने आधी काय करावं?
india vs bangladesh google
क्रीडा | T20 WC

IND vs BAN, Pitch Report: टॉस ठरणार बॉस! बांगलादेशला हरवण्यासाठी टीम इंडियाने आधी काय करावं?

Ankush Dhavre

भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील ४ पैकी ३ सामने जिंकून भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा पराभव केला. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २ हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड आणि कसं असेल हवामान? जाणून घ्या.

भारत आणि बांगलादेश यांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर भारतीय संघाचं पारडं जड राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ १३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर केवळ १ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघ ४ वेळेस आमनेसामने आले आहेत. या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बांगलादेशला धूळ चारली आहे.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा सामना हा अँटीग्वातील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगणार आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. यासह फलंदाजांनाही मदत उपलब्ध असते. मात्र सामना जसजसा पुढे जाईल, तशी खेळपट्टी स्लो होत जाईल. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणं कठीण होऊन जाईल.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात; ५ जण जागीच ठार

Pune Drunk And Drive News: पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबांना जामीन!

Sangli News: सांगलीच्या पलूसमध्ये धक्कादायक प्रकार; बालक पोषण आहारात मृत वाळा साप!

Shukra Gochar 2024: सिंह राशीत शुक्र ग्रहाचं संक्रमण; ३ राशींवर होणार परिणाम, अनेकांना येणार आर्थिक अडचणी

Video : धक्कादायक! सांगलीत पोषण आहारात सापडला मृत वाळा साप; गर्भवती माता-बालकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार

SCROLL FOR NEXT