भारत-बांगलादेश यांच्यात अॅडलेडच्या मैदानात अटीतटीचा सामना झाला. के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्या झुंजार खेळीमुळं भारताना बांगलादेशला 185 धावांचा आव्हान दिलं होतं. परंतु, बांगलादेश सात षटकानंतर 66 धावांवर असताना मैदानात पाऊस पडला. त्यानंतर तासाभरानंतर पावसानं विश्रांती घेतल्यानंतर 16 षटकांच्या सामन्यात बांगलादेशला 151 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. त्यानंतर सामना सुरु झाल्यावर भारताचे गोलंदाज अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, रवीचंद्रन आश्विननं अप्रतिम गोलंदाजी करून बांगलादेशच्या फलंदाजांना माघारी पाठवला. त्यानंतर सामन्यात ट्विस्ट आल्यानंतर भारताने अखेर पाच धावांनी सामना जिंकून बांगलादेशचा पराभव केला.
27 चेंडूत 60 धावा कुटून लिटन माघारी परतला. त्यानंतर नजमोल शांतोही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर 21 धावांवर बाद झाला. दहाव्या षटकात शमीनं भेदक गोलंदाजी करून शान्तोला बाद करून अवघ्या चार धावा दिल्या. त्यानंतर बाराव्या षटकात अर्शदीपनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. अफिफ हौसेनला 3 धावांवर बाद केल्यानंतर कर्णधार शाकिबचीही शिकार केली. शाकिब 13 धावा करून माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पंड्यानंही अप्रतिम गोलंदाजी करून बांगलादेशचा फलंजदाज यासिर अलीला अवघ्या एक धावेवर बाद केलं.
पावसाच्या विश्रांतीनंतर भारत-बांगलादेशचा सामना सुरु झाला आहे. भारत-बांगलादेश यांच्यात सुरु असलेला सामना पावसाच्या व्यत्ययामुळं 16 षटकांचा खेळवण्यात येत आहे. बांगलादेशला 151 धावांचं टार्गेट देण्यात आलं आहे. रवीचंद्रनने टाकलेल्या आठव्या षटकात के एल राहुलनं अप्रतिम फिल्डिंग करून आक्रमक खेळी करणाऱ्या लिटन दासला धावबाद केलं. 27 चेंडूत 60 धावा कुटून लिटन माघारी परतला. त्यानंतर नजमोल शांतोही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर 21 धावांवर बाद झाला. दहाव्या षटकात शमीनं भेदक गोलंदाजी करून शान्तोला बाद करून अवघ्या चार धावा दिल्या.
भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेत पॉवर प्ले मध्ये सलामीवीर फंलदाज लिटन दास आणि नजमुल शंटोनं धडाकेबाज खेळी केली. 26 चेंडूत 59 धावांचा डोंगर रचून लिटन दासनं बांगलादेशला चांगली सुरुवात दिली. मात्र, सात षटकानंतर बांगलादेश 66 धावांवर असताना मैदनात पावसाचा खेळ सुरु झाला. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू पव्हेलियनध्ये परतले आहेत. डीएलएसच्या नियमानुसार बांगलादेश 17 धावांनी पुढं आहे. म्हणजेच पाऊस जर थांबला नाही तर भारताचा पराभव निश्चित आहे.
बांगलादेशचे सलामीवीर फलंदाज लिटन दास आणि नजमुल शंटोनं पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. लिटननं अवघ्या 21 चेंडूत 50 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. भूवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर लिटननं चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे बांगलादेशची धावसंख्या सात षटकानंतर बिनबाद 66 वर पोहोचली.
भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारनं पहिल्या षटकात सटीक लाईनवर गोलंदाजी केली. त्यामुळे बांगलादेशचे सलामीवीर नजमुल शंटो आणि लिटन दास यांना मोठे फटके मारता आले नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगनं 12 धावा दिल्यानं बांगलादेशची धावसंख्या 14 वर पोहोचली. त्यानंतर लिटन दासने गिअर बदलून भारतीय गोलंदाजीवर आक्रमक खेळी केली. दासच्या चौफेर फटकेबाजीमुळं पाच षटकानंतर बांगलादेश बिनबाद 44 धावांवर पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकप 2022 चा थरार सुरु असून आज भारत आणि बांगलादेश मध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची लढत होत आहे. अॅडलेडच्या मैदानात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मागील तीन सामन्यात धावांसाठी संघर्ष करणारा के एल राहुल फॉर्मात आला. राहुलने क्लास बॅटिंग करून 32 चेंडूत 50 धावा कुटल्या. त्यानंतर कमालीचा फॉर्मात असलेल्या विराट कोहलीनं मैदानात धावांचा पाऊस पाडला. 44 चेंडूत 64 धावांची आक्रमक खेळी करून विराट टी20 वर्ल्डकपमधील नंबर वन फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादवनंही नेहमीप्रमाणे चौफेर फटकेबाजी करून 16 चेंडूत 30 धावा केल्या. या तिघांच्या आक्रमक खेळीमुळं भारतानं वीस षटकात 6 विकेटस् गमावून 184 धावांची मजल मारली.
चौदाव्या षटकात बांगलादेशचा कर्णधार शाकिब उल हसनने कमालीचा फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला क्लीन बोल्ड केलं. सूर्यकुमारने पुन्हा एकदा आक्रमक खेळी करून 16 चेंडूत 30 धावा कुटल्या. परंतु, सोळाव्या षटकात बांगलादेशच्या हसन महमूदनं हार्दिक पंड्याला स्वस्तात माघारी पाठवलं. पंड्या 6 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. सतराव्या षटकात विराट कोहलीनं अर्धशतकी खेळी साकारून भारताच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. दरम्यान, टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात विराट नंबर वन फलंदाज बनला आहे. परंतु, त्यानंतर दिनेश कार्तिक धावबाद झाला आणि भारताला पाचवा धक्का बसला. त्यानंतर 19 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर महमूदनं अक्षर पटेलला सात धावांवर बाद केलं.
भारताचा सलामीवीर फलंदाज आणि उप कर्णधार के एल राहुल मागील तीन सामन्यांत स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर आजच्या बांगलादेश विरुद्धच्या चौथ्या सामन्यात राहुलनं क्लास बॅटिंग करून अर्धशतक ठोकलं. राहुलनं 32 चेंडूत 50 धावा कुटल्या. मात्र, दहाव्या षटकात कर्णधार शाकिबने के एल राहुलला झेलबाद केलं. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव सावध फलंदाजी करत आहेत.
चौथ्या षटकात हसन महमूदच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा २ धावांवर बाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकात राहुलनं पॉईंटच्या दिशेनं षटकार ठोकून भारताच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. पाचव्या षटकात विराट कोहलीनं तस्किनच्या गोलंदाजीवर पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारले. राहुल-विराट भारताची कमान सांभाळत आहेत. सहाव्या षटकात मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर राहुल-विराटने सावध खेळी केली. त्यामुळे पॉवर प्ले संपल्यानंतर भारताची धावसंख्या एक बाद 37 वर पोहोचली. टी20 वर्ल्डकपमध्ये 1017 धावा करून विराट कोहली अव्वल स्थानावर पोहोचला आहे. कर्णधार शाकिबने आठव्या षटकात दहा धावा दिल्यानं भारताची धावसंख्या एक बाद 52 धावांवर पोहोचली. दहाव्या षटकात कर्णधार शाकिबने के एल राहुलला झेलबाद केलं.
बांगलादेशचा गोलंदाज तस्किन अहमदने तिसऱ्या षटकात रोहित शर्माला आखूड टप्प्यावर चेंडू टाकला. षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहितचा बाऊंड्री लाईनवर झेल सुटल्याने त्याला जीवदान मिळालं होतं. परंतु, चौथ्या षटकात हसन महमूदच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा २ धावांवर बाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकात राहुलनं पॉईंटच्या दिशेनं षटकार ठोकून भारताच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. पाचव्या षटकात विराट कोहलीनं तस्किनच्या गोलंदाजीवर पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारले. राहुल-विराट भारताची कमान सांभाळत आहेत.
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी भारताचे धुरंधर सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानात उतरले आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदनं पहिल्या षटकात अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्यामुळं भारताला फक्त एक धावसंख्या मिळाली. दुसऱ्या षटकात शौरिफूल इस्लामच्या गोलंदाजीवर के एल राहुलनं फाईन लेगच्या दिशेनं षटकार ठोकला. त्यामुळे भारताची धावसंख्येत वाढ होऊन भारत 10-0 वर पोहोचला.
ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकप 2022 चा थरार सुरु असून आज भारत आणि बांगलादेश मध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची लढत होत आहे. भारताचा सुपर 12 मधील चौथा सामना अॅडलेडच्या मैदानात बांगलादेश विरुद्ध होणार आहे. दोन्ही संघामध्ये आज 'कॉंटे की टक्कर' होणार असून तमाम क्रिडा चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान, पावसाचे सावटही घोंगावत असून आजच्या सामन्यात पाऊस हजेरी लावतो की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.