भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील १७ वा सामना सुरू आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने ५० षटक अखेर ८ गडी बाद २५६ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत विजयी चौकार मारण्यासाठी २५७ धावांची गरज आहे.
या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय बांगलादेशच्या सलामीवीर फलंदाजांनी योग्य ठरवत ९३ धावांची भागीदारी केली.
सलामीवीर फलंदाज तन्जिद हसनने ४३ चेंडूंचा सामना करत ५१ धावांची खेळी केली. तर लिटन दासने ८२ चेंडूंचा सामना करत ६६ धावा चोपल्या. ही जोडी जमलेली असताना कुलदीप यादवने हसनला बाद करत ही जोडी तोडली.
पहिला विकेट पडल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार हल्लाबोल करत बांगलादेशच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. संघातील अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहिम ३८ धावा करत माघारी परतला. शेवटी महमदुल्लाहने ४६ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २५६ धावांपर्यंत पोहचवली. (Latest sports updates)
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, मोहम्मद सिराज ६० धावा खर्च करत २ गडी बाद केले. फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने ३८ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर संघातील अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील २ गडी बाद केले. तर शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.