India vs Bangladesh Saam TV
क्रीडा

India vs Bangladesh: शाकिबची झुंझार खेळी! टीम इंडियाला जिंकण्यासाठी २६६ धावांचे आव्हान

Ruchika Jadhav

Cricket News In Marathi:

भारत विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ चा अंतिम सामना सुरू आहे. कोलंबोच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी बाद २६५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २६६ धावांची गरज आहे. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून फलंदाजी करताना शाकिब अल हसनने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याचे शतक अवघ्या २० धावांनी हुकले. तर तोहीद हृदोयने ५४ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ५ चौकार आणि २ षटकार खेचले. शेवटी नसूम अहमदने ४४ धावांचे योगदान दिले. या बांगलादेशने ८ गडी बाद २६५ धावा केल्या आहेत.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

या सामन्यासाठी अशी आहे बांगलादेश संघाची प्लेइंग ११:

लिटन दास (यष्टीरक्षक), तनझिद हसन, अनामूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT