team india twitter
Sports

IND vs BAN: रोहित- राहुल- हार्दिक चुकले, बॉलर्सने भोगलं; ज्यांच्या कॅच सोडल्या, त्यांनी गोलंदाजांना फोडलं

India vs Bangladesh, ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील पहिला सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध सुरु आहे. भारतीय संघाने सुरुवातीच्या १० षटकात दमदार सुरुवात केली होती.

हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने भारतीय संघाला दमदार कामगिरी करुन दिली. गोलंदाजांना जी जबाबदारी मिळाली होती, ती त्यांनी योग्यरित्या बजावली. मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी कमी पडले. त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांनी शानदार शतकी भागीदारी केली. ी

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण स्विकारुन भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना एका पाठोपाठ एक मोठे धक्के दिले. आधी हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि त्यानंतर अक्षर पटेलने सलग २ गडी बाद करुन बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत धाडला.

क्षेत्ररक्षकांची चूक गोलंदाजांना भोवली

या सामन्यातील ९ वे षटक भारतीय संघासाठी निर्णायक ठरले. या षटकात अक्षर पटेलने बांगलादेशला लागोपाठ २ धक्के दिले. याच षटकात अक्षरला हॅट्रीक घेण्याची संधी होती. मात्र रोहित शर्माने सोपा झेल सोडला. त्याच फलंदाजाने पुढे अर्धशतकी खेळी केली. तर हार्दिक पंड्याने ज्या फलंदाजाचा झेल सोडला त्या हृदोयने देखील अर्धशतकी खेळी केली. दोघांनी मिळून दीड शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. यादरम्यान केएल राहुलला यष्टीचीत करण्याची संधी मिळाली होती. मात्र ही संधी देखील त्याने सोडली.

भारतीय संघात जगातील एकापेक्षा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. मात्र या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांचा दर्जा खालावलेला दिसून आला. कारण हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि केएल राहुल हे तिघेही अनुभवी खेळाडू आहेत. जर रोहितने तो झेल पकडला असता, बांगलादेचा डाव लवकर आटोपला असता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT