team india twitter
क्रीडा

IND vs BAN: शेवटच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाची Playing XI बदलणार; या तिघांना संधी मिळणार

Ankush Dhavre

Team India Playing XI Prediction: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार खेळ करत टी -२० मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

आता मालिकेतील तिसरा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ कसोटीनंतर टी -२० मालिकेतही बांगलादेशचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

या प्रमुख खेळाडूला बसवणार

बांगलादेशविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये संजू सॅमसनला पदार्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. संजूला संधी देण्याची जोरदार मागणी होती. मात्र संधी मिळाल्यानंतर त्याला संधीचं सोनं करता आलेलं नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

हा खेळाडू करणार पदार्पण?

या मालिकेतील पहिल्याच सामन्यात २ खेळाडूंना संधी दिली गेली होती. नितीश कुमार रेड्डी आणि मयांक यादव या दोघांनी सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता तिसऱ्या सामन्यात आणखी एका गोलंदाजाला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. या सामन्यात हर्षित राणा पदार्पण करू शकतो. त्याला मयांक यादवच्या जागी संधी दिली जाऊ शकते. मयांकला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये केवळ २ गडी बाद करता आले आहेत.

या फलंदाजाला संधी मिळणार?

यासह भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये आणखी एक मोठा बदल केला जाऊ शकतो. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या तिलक वर्माचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर वॉशिंग्टन सुंदरला विश्रांती दिली जाऊ शकते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Solution: पुण्याची वाहतूक कोंडी कशी सुटणार? देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्लान सांगितला

Rohit Pawar News : लाडकी बहीण योजना बंद नव्हे सुरूच ठेवणार; आमदार रोहित पवार यांच्याकडून योजनेचे कौतुक

Noel Tata : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेले नोएल टाटा नक्की कोण आहेत? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: "महाराष्ट्राला नानाभाऊच मुख्यमंत्री हवेत! लवकरच नानापर्व!"पुण्यात झळकले पटोले यांचे फ्लेक्स

Viral News : वाढीव बिलामुळे नगरसेविका संतापली; काठी घेऊन वीज वितरण कार्यालयात धडकली, अधिकाऱ्यांवर भडकली, VIDEO

SCROLL FOR NEXT