IND vs BAN 2nd Test, Kanpur Pitch Report: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात बांगलादेशला २८० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
यासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात कशी असेल खेळपट्टी? जाणून घ्या.
मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोघांनाही मदत मिळाली. भारताकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ४ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात अश्विनच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. अश्विनने या डावात ६ गडी बाद केले.
कानपूरच्या खेळपट्टीबाबत बोलायचं झालं तर, ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकते. चेपॉकच्या मैदानावर चेंडू उसळी घेत होता. मात्र या खेळपट्टीवर चेंडू कमी उसळी घेईल. त्यामुळे भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो.
या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज चमकले होते. भारताकडून अक्षर पटेल, आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने शानदार कामगिरी केली होती. चेपॉकच्या मैदानावर भारतीय संघ ३ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. मात्र या सामन्यात भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. त्यामुळे कुठल्यातरी एका वेगवान गोलंदाजाला प्लेइंग ११ मधून बाहेर बसावं लागेल.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.