team india 
Sports

IND vs BAN 2nd Test: भारत - बांगलादेश कसोटीत चौथ्या दिवशी सॉलिड ट्विस्ट; उद्या थेट रीझल्ट लागणार

India vs Bangladesh 2nd Test Day 4 Highlights: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा शेवट झाला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीचे ३ दिवस पावसामुळे धुतले गेले. मात्र चौथ्या दिवशी पैसा वसूल क्रिकेट पाहायला मिळाले आहे.

आधी भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने ताबडतोड फलंदाजी करत २८५ धावा केल्या. सामन्यातील सुरुवातीचे ३ दिवस पावसामुळे धुतल्यानंतर असं वाटलं होतं की, हा सामना ड्रॉ होणार. मात्र आता भारतीय संघ विजयाच्या वाटेवर आहे.

बांगलादेशने केल्या २३३ धावा

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला २३३ धावा करता आल्या. बांगलादेशकडून फलंदाजी करताना मोमिनुल हकने नाबाद १०७ धावांची खेळी केली. तर कर्णधार शांतोने ३१ धावांची खेळी केली.

तर शदनम इस्लामने २४ आणि मिराजने २० धावांची खेळी केली. भारतीय संघातील गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३, मोहम्मद सिराज,आकाश दीप आणि आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासह रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला.

भारतीय संघाने घेतली आघाडी

बांगलादेशचा डाव २३३ धावांवर आटोपल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ६८ धावांची खेळी केली. विराट कोहलीने ४७ धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने ३९ धावा केल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात ९ गडी बाद २८५ धावा करत डाव घोषित केला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ११: शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तेजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT