kanpur cricket ground twitter
क्रीडा

IND vs BAN 2nd Test: कानपूर कसोटीचा तिसरा दिवसही पाण्यात! क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड

India vs Bangladesh Day 3 Called Off Due To Rain: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा दिवसही पावसामुळे धुतला गेला आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 2nd Test Day 2: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यातील तिसरा दिवसही पावसामुळे धुतला गेला आहे.

कानपूरच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांना बॅटिंगची संधी मिळालेली नाही. तर बांगलादेशने ३५ षटकं बॅटिंग केली. तर पावसाने दोन्ही दिवस तुफान बॅटिंग केली आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र आता ३ दिवसांचा खेळ पावसामुळे रद्द झाल्यानंतर हा सामना ड्रॉ च्या दिशेने जात आहे. भारतीय संघाने १-० ने मालिका तर जिंकेल. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताचं मोठं नुकसान होणार आहे. कारण दोन्ही संघांना प्रत्येकी ४-४ गुण दिले जातील.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आलेल्या बांगलादेशला भारतीय संघाने सुरुवातीलाच २ मोठे धक्के दिले. आकाश दीपने जाकीर हसन आणि शदमन इस्लामला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर कर्णधार शांतोने ३१ धावा केल्या. मोमिनूल हक ४० धावांवर तर मुशफिकूर रहिम ६ धावांवर नाबाद आहे. बांगलादेशने आतापर्यंत ३ गडी बाद १०७ धावा केल्या आहेत.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघाची प्लेइंग ११: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ११: शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तेजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

SCROLL FOR NEXT