India Vs Bangladesh, Jaydev Unadkat Latest News : बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग ११ घोषित झाली. त्यावेळी सर्वच क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. टीम इंडियाचा मागच्या कसोटी सामन्याचा हिरो कुलदीप यादव याला संघाबाहेर ठेवण्यात आलं.
तर जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकट याला संधी देण्यात आली. जयदेव उनाडकट यानं १२ वर्षे २ दिवसानंतर टीम इंडियाच्या संघात पुनरागमन केलं. विशेष म्हणजे, दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पहिलं यश जयदेवनंच मिळवून दिलं. हा त्याचा पहिला कसोटी विकेटही ठरला. पदार्पणानंतर तब्बल ४३८९ दिवसांनी त्यानं कसोटीत पहिली विकेट घेतली. (Latest Marathi News)
जयदेव उनाडकट यानं १६ डिसेंबर २०१० रोजी टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र, त्यानंतर कधीच तो टीम इंडियाच्या कसोटी संघात परतला नाही. जयदेवला तब्बल दोन तपानंतर पुन्हा टीम इंडियात संधी मिळाली. त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिला विकेटही घेतला. जयदेवला कसोटी पदार्पणाच्या ४३८९ दिवसांनंतर पहिला विकेट मिळाला. तो यापूर्वी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी त्याला विकेट मिळाला नव्हता. (Cricket News)
जयदेव उनाडकट याला आपल्या कारकिर्दीतील दुसरा कसोटी सामना खेळण्याआधी ११८ कसोटी सामन्यांत संधी मिळू शकली नव्हती. पहिल्या कसोटी सामन्यानंतर दुसरा सामना खेळण्यासाठी जी प्रतीक्षा करावी लागली तो काळ आतापर्यंतचा सर्वात मोठा काळ आहे. जयदेवच्या आधी दिनेश कार्तिकला पुनरागमनासाठी ८७ कसोटी सामन्यांची वाट पाहावी लागली होती.
विशेष म्हणजे सन २०१० मध्ये जयदेव उनाडकट पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी विराट कोहलीनं कसोटीत पदार्पणही केलं नव्हतं. दुसरीकडे, सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत होता. बऱ्याच वर्षांनंतर जयदेवला दुसरा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.
जयदेवनं रणजी करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला टीम इंडियात पुनरागमनाची संधी मिळाली. जयदेवनं ९६ प्रथम श्रेणी सामन्यांत ३५३ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं फलंदाजीतही कमाल केली आहे. त्याने ७ अर्धशतकेही झळकावली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.