India Vs Bangladesh 2nd Test, 3rd Day Match SAAM TV
Sports

Ind Vs Ban : 7, 2, 6, 1...खेळ खल्लास! टीम इंडियाचे दिग्गज कसे ढेपाळले बघा; आता पराभवाचं सावट

India Vs Bangladesh 2nd Test, 3rd Day Match : टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली असून, आता पराभवाचं सावट आहे.

Nandkumar Joshi

Ind Vs Ban 2nd Test : गचाळ क्षेत्ररक्षण आणि नंतर फलंदाजीत हाराकिरी यामुळं टीम इंडिया संकटात सापडली आहे. बांगलादेशच्या गोलंदाजांनी मीरपूरच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांना अडचणीत आणलं. बांगलादेशनं भारतासमोर १४५ धावांचं लक्ष्य ठेवलं. टीम इंडियातील भक्कम फलंदाजी क्रम बघता तुलनेने हे आव्हान सोपं वाटत असताना, बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर दिग्गजांनी नांगी टाकली. आता कसोटी जिंकणं तर दूर, पण पराभवाचं सावट टीम इंडियावर घोंघावतंय.

भारतानं दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत आपले चार फलंदाज गमावले होते. अवघ्या ४५ धावांवर हे चार दिग्गज फलंदाज तंबूत परतले आहेत. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी जयदेव उनाडकट आणि अक्षर पटेल मैदानात होते. अक्षर पटेलनं २६ धावा केल्या आहेत, तर उनाडकट ३ धावांवर खेळत आहे. (Sports News)

बांगलादेशनं पहिल्या डावात २२७ धावाच केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियानं ३१४ धावा करून ८७ धावांची आघाडी घेतली. भारतानं दुसऱ्या डावात बांगलादेशला धावा करू दिल्या नाहीत. २३१ धावांवरच बांगलादेशला गुंडाळलं. भारतीय संघ अद्याप विजयापासून १०० धावा दूर आहे. तर सहा विकेट हातात आहेत. पण भारतानं आघाडीचे फलंदाज गमावले आहेत ही खरी अडचण आहे. (Team India)

फिरकीपटूंनी घ्यायला लावली गिरकी

तिसऱ्या दिवशी पिच फिरकीपटूंना मदत करताना दिसू लागलीय. त्यामुळंच बांगलादेशचा कर्णधार शाकिबनं पहिलं षटक टाकलं. एका बाजूने शाकिब तर, दुसऱ्या बाजूने तैजुल इस्लामनं भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणले आहेत. तिसऱ्या षटकात शाकिबनं केएल राहुलला (२ धावा) बाद केलं. तर मेहदी हसन मिराजनं चेतेश्वर पुजाराला (६ धावा) टिपलं. मिराजनंच सलामीवीर शुभमन गिलला (७ धावा) बाद केले.

विराट कोहलीकडून अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षांवरही पाणी फेरलं. मिराजच्या चेंडूवर सोपा झेल देऊन विराट कोहलीही तंबूत परतला. कोहलीनं अवघी एक धाव केली.

बांगलादेशचा जिगरबाज खेळ

तत्पूर्वी बांगलादेशच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही अडखळती झाली. अक्षर पटेल आणि इतर गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना अडचणीत आणलं. लिटन दास आणि जाकिर हसननं अर्धशतकी खेळी करून डाव सावरला. लिटन दासने ७३ धावा केल्या. हसनने ५१ धावांची खेळी केली. तर हसन आणि तस्कीन यांनी प्रत्येकी ३१ धावा केल्या. तस्कीन नाबाद राहिला.

भारताकडून अक्षर पटेल याने तीन विकेट घेतल्या. रविचंद्रन अश्विन आणि सिराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उमेश यादव आणि जयदेव उनाडकट याने प्रत्येकी एक गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुपारी मोबाइल सील, मग रात्री ११.१३ वाजता व्हॉट्सॲपचा लास्ट सीन कसा? फिंगर लॉकद्वारे...; डॉक्टरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा

Suryakumar Yadav: श्रेयस अय्यरची तब्येत कशीये? पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

Gold Rate Fall: धनत्रयोदशीपासून सोन्याचे दर घसरले, तब्बल ७६०० रूपयांनी झालं स्वस्त; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT