R ASHWIN TWITTER
क्रीडा

IND vs BAN, 1st Test: आणखी काय हवं..अश्विनचं अर्धशतक पूर्ण होताच वडिलांकडून कौतुकाचा वर्षाव, PHOTO व्हायरल

Ravindra Jadeja - R Ashwin, IND vs BAN 1st Test: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या जोडीने शतकी भागीदारी केली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात चेन्नईच्या वाघाने बांगलादेशच्या वाघांना चांगलाच घाम फोडला आहे. ज्या खेळपट्टीवर भारतीय संघातील टॉप ऑर्डरचे फलंदाज काही मिनिटेही टिकू शकले नाही. याच मैदानावर अश्विनने अर्धशतकी खेळी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. हसन महमूदच्या धारदार गोलंदाजीसमोर भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांनी नांग्या टाकल्या. विराट कोहली, रोहित शर्मा प्रत्येकी ६-६ तर शुभमन गिल भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर संघाचा डाव पुढे घेऊन जाण्याचा दबाव आला होता.

रिषभ- यशस्वीने सावरला डाव

टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल खेळपट्टीवर टिकून राहिले. ३४ धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर त्यानंतर रिषभ पंत आणि यशश्वी जयस्वाल यांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. रिषभ पंत ३९ चेंडूत माघारी परतला. तर यशस्वी जयस्वालला मोठी खेळी खेळण्याची संधी होती. मात्र तो ५६ धावा करत तंबूत परतला.

जडेजा- अश्विनची अर्धशतक

भारतीय संघ अडचणीत असताना जडेजा आणि अश्विनची जोडी मदतीसाठी धावून आली. संकटकाळी भारतीय संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी करण्याची या जोडीची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ही दोघांनी अनेकदा भारतीय संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी केली आहे. दोघांनी मिळून संघासाठी शतकी भागीदारी केली.

सुरुवातीला आर अश्विनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर जडेजानेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान आर अश्विनने आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याच्या आईंकडूनही कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे. हा सामना पाहण्यासाठी त्याच्या आईदेखील स्टॅन्डमध्ये उपस्थित आहेत. अर्धशतक पूर्ण होताच त्याच्या वडिलांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT