India vs Bangladesh 1st Test 
क्रीडा

IND vs BNG 1st Test: खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला; विजयासाठी भारताला हव्यात ६ विकेट

Bharat Jadhav

भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने लक्ष्याचा पाठलाग करताना ४ बाद १५८ धावा केल्या. अधुंक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला.

बांगलादेशने तिसऱ्यादिवशी ४ विकेट गमावत १५८ धावा केल्या आहेत. नजमुल हुसैन शांती ५१ तर शाकिब अल हसन ५ धावा करून नाबाद आहेत. बांगलादेश विजयापासून ३५७ धावा दूर आहे, तर भारताला सामना जिंकण्यासाठी ६विकेट्सची गरज आहे. खराब प्रकाशामुळे खेळ सुमारे ४० मिनिटे लवकर संपवण्यात आला. तिसऱ्या दिवसाच्या जेवणानंतर टीम इंडियाने ४ विकेट गमावल्यानंतर आपला डाव घोषित केला होता.

आज भारतीय संघाने २८७ धावा केल्या होत्या. त्या धावांच्या जोरावर भारताने विजयासाठी बांगलादेशासमोर ५१५ धावांचं आव्हान ठेवले आहे. भारताने आपल्या पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेश १४९ धावांवर गारद झाला होता. यामुळे भारताला पहिल्या डावात २२७ धावांची लीड मिळाली होती.

दरम्यान तिसऱ्या दिवसाचा खेळ संपपर्यंत टीम इंडियाने बांगलादेशाच्या ४ विकेट पडल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली होती. शादमान इस्लाम आणि झाकीर हसन यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ही भागीदारी तोडली. त्याने झाकीरला झेलबाद केले. झाकीरने ३३ धावा केल्या. त्यानंतर ऑफस्पिनर आर.अश्विनने शादमान इस्लामला पायचीत करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. शदमानने बाद होण्यापूर्वी ३५ धावा केल्या. त्यानंतर अश्विनने तिसरी आणइ चौथी विकेट घेत भारताची स्थिती बळकट केली.

अश्विनने मोमिनुल हकचा त्रिफळा उडवत भारतीय संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. त्यावेळी बांगलादेशने १२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर परत अश्विनने मुश्फिकुर रहीमला १३ धावांवर बाद केलं. दरम्यान अश्विनने पाचवेळा मुश्फिकुरला बाद केलं. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने अर्धशतक केलं.

भारतीय संघाचा दुसरा डाव

भारताला दुसऱ्या डावात तिसऱ्याच षटकातच पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदच्या चेंडूवर झेलबाद झाला. रोहितने ५ धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज नाहिद राणाच्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल झेलबाद झाला. त्यानंतर भारताने ६७ धावांवर विराट कोहलीची विकेट गमावली. फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला. कोहलीने फक्त १७ धावा केल्या.

यात दोन चौकारांचा समावेश होता. यानंतर शुभमन गिल आणि ऋषभ पंत या जोडीने चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने १२८ चेंडूंचा सामना करत १०९ धावा केल्या. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचं सहावे शतक होतं. पंत बाद झाल्यानंतर काही वेळातच शुभमन गिलनेही आपले शतक पूर्ण केलं. शुभमन गिलने ११९ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Number 7 : पैसे मिळवण्याची कला, स्वतंत्र वृत्ती; ७,१६,२५ तारखेला जन्मलेले व्यक्ती कसे असतात? वाचा भाग्यांक

Pune Road Potholes: पुणे पालिकेची काढली लाज, रस्त्यावरील खड्ड्यांवरून लक्तरं वेशीला; नितीन गडकरी यांची राज्य सरकारला नोटीस

Nanded Politics : सेनापती भाजपात, 'सेना' कांग्रेसमध्ये; विधानसभेत नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना कुणाचं आव्हान? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : तिरुपती बालाजी मंदिर लाडू प्रसाद प्रकरण,चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Jalgaon Politics: गिरीश महाजन माझे पाय धरायचे; आता त्यांना जागा दाखवा, खडसेंची भाजपच्या 'संकटमोचका'वर सणसणीत टीका

SCROLL FOR NEXT