Travis Head Century Saamtv
Sports

Travis Head Century: ट्रॅव्हिस हेड ठरला टीम इंडियाच्या वाटेतला काटा; हायहोल्टेज सामन्यात झुंझार शतकी खेळी!

World Cup Final: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने धडाकेबाज शतक झळकावत टीम इंडियाच्या विजयात खोडा घातला.

Gangappa Pujari

India Vs Aus World Cup Final:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील अंतिम सामना नरेंद्र स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाच्या २४१ धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची विजयी घौडदौड सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने धडाकेबाज शतक झळकावत टीम इंडियाच्या विजयात खोडा घातला.

भारताचे 241 धावांचे आव्हान पार करताना आक्रमक ऑस्ट्रेलियाने पहिल्याच षटकात 15 धावा चोपल्या होत्या. स्मिथ बाद झाल्यानंतर हेडने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सूत्रं आपल्या हातात घेतली. त्याने लाबुशेनसोबत अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकाच्या जवळ पोहचवले.

ट्रॅव्हिस हेडने प्रथम 57 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 95 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 1 षटकार आणि 14 चौकार मारले. हेडचे या विश्वचषकातील हे दुसरे शतक होते तर त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे ५वे शतक होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलियाची विजयी घौडदौड..

या विश्वचषकात, फायनलपूर्वी, हेडने न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी सामन्यात १०९ धावांची इनिंग खेळली होती. सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होत. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २४० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT