india win saam tv
Sports

Ind vs Aus: पर्थचा कौल अखेर भारताच्याच बाजूने; टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव

India Won The India vs Australia 1st Test Match: पर्थ टेस्टवर टीम इंडियाने कब्जा केला आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्याच टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टेस्ट पर्थमध्ये खेळवण्यात आली. या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विदय मिळवला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना त्यांच्याच मैदानावर धूळ चारली. या विजयामुळे या सिरीजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाचा २९५ रन्सने मोठा विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 रन्सचं लक्ष्य होतं. ज्याचा पाठलाग करणं जवळपास अशक्य मानलं जात होतं.

ऑस्ट्रेलियन टीमचा दुसरा डाव केवळ 238 रन्सवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने टेस्ट सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतलीये. या सिरीजमधील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियन टीमचा दुसरा डाव केवळ 238 रन्सवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने टेस्ट सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतलीये. या सिरीजमधील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे.

पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर झालेल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जावं लागलंय. याआधी ऑस्ट्रेलियाने या मैदानावर चार सामने खेळले होते, ज्यात त्यांनी विजय मिळवला होता. 19 जानेवारी 2021 रोजी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबामध्ये विजय मिळवला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने ३१ वर्षांनी त्या मैदानावर टेस्ट सामना गमावला होता. त्यानंतर आता भारतीय संघानेही पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर कांगारूंना धुव्वा उडवला आहे.

पर्थ टेस्टसाठी कशी होती भारताची प्लेईंग ११

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT