Rohit Sharma: पर्थ टेस्टदरम्यान अचानक रोहित शर्माची एन्ट्री; चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

Rohit Sharma: पर्थ टेस्टमध्ये सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये कोच गौतम गंभीरसोबत बसलेला दिसला.
rohit Sharma sudden entry during the Perth
rohit Sharma sudden entry during the Perthsaam tv
Published On

पर्थमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात रोहित शर्मा अनुपस्थितीत होता. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहकडे देण्यात आलीये. मात्र सामन्याच्या चौथ्या दिवशी ड्रेसिंगरूममध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला स्पॉट करण्यात आलं.

दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी रोहित त्याची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत मुंबईत होता. यावेळी त्याच्या मुलाच्या जन्मानंतर, असं म्हटलं जातं होतं की, तो मुंबईहून ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो आणि पर्थ टेस्टमध्ये सहभागी होऊ शकतो. मात्र तसं झालं नाही. मात्र त्यानंतर रोहित तातडीने ऑस्ट्रेलियाला पोहोचला आणि पर्थ टेस्टच्या चौथ्या दिवशी तो ड्रेसिंग रूममध्ये दिसून आला.

rohit Sharma sudden entry during the Perth
Yashasvi Jaiswal: पर्थवर यशस्वी जयस्वाल नावाचं तुफान; कांगारू गोलंदाजांची धुलाई करत ठोकलं शतक

गौतम गंभीरसोबत स्पॉट झाला रोहित शर्मा

पर्थ टेस्टमध्ये सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये कोच गौतम गंभीरसोबत बसलेला दिसला. तो शनिवारी मुंबईहून पर्थला रवाना झाला होता. त्यानंतर तो रविवारी पर्थला पोहोचला आणि सोमवारी टीमसोबत सामील झाला. कर्णधाराचे इनपुटही चौथ्या दिवशी मिळणार आहे.

rohit Sharma sudden entry during the Perth
Virat Kohli Century: शतकांचा दुष्काळ संपला! 'विराट' शतकासह किंग कोहलीने रचला इतिहास; डॉन ब्रॅडमनला सोडलं मागे

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह पहिल्या टेस्टमध्ये कर्णधारपद सांभाळतोय. सामन्यात कर्णधार आहे. पण रोहित शर्मा परत आल्याने दुसऱ्या सामन्यापासून हिटमॅन कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.

rohit Sharma sudden entry during the Perth
IND vs AUS 1st Test Day 3: यशस्वी- विराटनंतर, बुमराह चमकला! टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

रोहित शर्मा ॲडलेडमध्ये दुसरी टेस्ट खेळण्यापूर्वी दोन दिवसीय सराव सामन्यात खेळणार आहे. याशिवाय ते नेट प्रॅक्टिसही करताना दिसला. पर्थमध्ये केएल राहुलने दमदार कामगिरी केल्यामुळे आता टॉप ऑर्डरमधून कोणत्या फलंदाजाला डच्चू द्यायचा हा मोठा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com