ind vs aus twitter
Sports

IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाला आता पाऊसच वाचवू शकतो; चौथ्या दिवशी कसं असेल हवामान?

India vs Ausstralia 3rd Test Weather Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील चौथ्या कसोटीत कसं असेल हवामान? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारताला आता पावसावर अवलंबून राहावं लागणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील ३ पैकी २ दिवस पावसामुळे धुतले गेले आहेत.

तर एक दिवसाचा खेळ झाला आणि या एका दिवसात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. पहिल्या दिवशी १३.२ षटकांचा खेळ झाला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. तर तिसऱ्या दिवशीही पावसाची ये जा सुरुच होती. दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.

चौथ्या दिवशी कसं असेल हवामान?

या सामन्यातील चौथ्या दिवशीही पावसाचा कहर असेल. accuweather ने दिलेल्या माहितीनुसार सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चौथा दिवसही पावसामुळे धुतला जाईल. यावेळी तापमान ३१ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल, असं म्हटलं जात आहे.

भारतीय संघ अडचणीत

या सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या वाटेवर आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती.

मात्र एका पाठोपाठ एक भारताचे ४ फलंदाज माघारी परतले. तिसऱ्या दिवसाखेर अवघ्या ५१ धावांवर भारताचे ४ फलंदाज तंबूत परतले आहेत. केएल राहुल ३३ धावांवर तर रोहित शर्मा शून्यावर नाबाद आहे.

टॉप ऑर्डर पुन्हा एकदा फ्लॉप

या सामन्यातही भारतीय संघाचा टॉप ऑर्डर कोसळला आहे. या डावात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. पहिल्या चेंडूवर जयस्वालने चौकार मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर जयस्वाल बाद होऊन माघारी परतला.

त्याच्या पाठोपाठ शुभमन गिल १ आणि विराट कोहली ३ धावांवर माघारी परतला. रिषभ पंतलाही या डावात मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या ९ धावांवर तंबूत परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT