suryakumar yadav google
Sports

India Likely XI: संजू सॅमसन OUT, हर्षितचाही पत्ता कट होणार, प्लेईंग ११ मध्ये ३ बदलाची शक्यता

India Likely XI vs AUS : मेलबर्नच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारूण पराभव केला. पाच सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० ने आघाडी घेतली. तिसऱ्या टी२० सामन्यात भारताच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

India vs Australia 3rd T20: ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा दारूण पराभव करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. अभिषेक शर्माची झंझावाती खेळीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. गोलंदाजीतही भारतीय खेळाडूंना प्रभावी मारा करता आला नाही. मालिकेत बरोबरी करण्यासाठी आज भारतीय संघात मोठ्या बदलाचे संकेत मिळाले आहेत.

तिसऱ्या एकदिवसी सामन्यात भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला होता. आता तिसरा सामना जिंकून भारतीय संघ पलटवार करण्यासाठी सज्ज झाला आहे. संजू सॅमसन आणि हर्षित राणा यांना बाहेरचा रस्ता मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ आज तीन बदलासह मैदानात उतरू शकतो. भारताला मालिका जिंकण्यासाठी उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवावाच लागल.

दुसऱ्या टी२० सामन्यात एमसीजीवर भारतीय फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. फक्त १२५ धावांवर भारताचा डाव आटोपला होता. ऑस्ट्रेलियाने चार विकेटने या साम्यात बाजी मारली. अभिषेक शर्माने ६८ धावा केल्या नसत्या तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती. तिसऱ्या टी२० सामन्यासाठी भारत काही बदल करू शकतो. हर्षित राणाने फलंदाजीत चांगली कामगिरी केली, ३५ धावा केल्या. पण त्याची गोलंदाजी महागडी ठरली. दोन षटकांत त्याने २७ धावा खर्च केल्या. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर अथवा अर्शदीप सिंह याचा विचार केला जाऊ शकतो.

कुलदीप यादव यालाही संघाबाहेर बसवले जाऊ शकते. कुलदीप यादव याच्या जगी वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली जाऊ शकते. संजू सॅमसनला मेलबर्न टी२० सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याच्या जागी तिसऱ्या टी-२० सामन्यात जितेश शर्माला संधी दिली जाऊ शकते. मालिका वाचवण्यासाठी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागतील.

भारताची संभाव्य प्लेईंग ११

शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ब्रिजवर अचानक ब्रेक मारला, ३-४ वाहने धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Politics: त्यांना पक्ष वाढवायचाय की संपवायचाय?, शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेत्यांवर निशाणा

Palash Muchhal Networth: स्मृती मंधानाचा पतीची आहे इतक्या कोट्यवधींचा मालक

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा हैदोस! २५ ते ३० वाहनांची तोडफोड, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT