team india twitter
Sports

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना.. दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत २९५ धावांनी विजय नोंदवला होता.

मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी मुळीच सोपा नसणार आहे. कारण हा डे-नाईट कसोटी सामना असणार आहे. डे- नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवणं हे मुळीच सोपं नाही. कारण, ऑस्ट्रेलियाने एकही कसोटी सामना गमावलेला नाही. या सामन्यापूर्वीच भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

सराव सामन्यावर पाणी

या मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला सराव सामना खेळण्याची संधी मिळाली. प्राईम मिनिस्टर ११ आणि भारतीय संघात २ दिवसीय डे- नाईट सराव सामना रंगणार आहे.

मात्र या सामन्यातील पहिल्याच दिवशी पावसाने खोडा घातला. पावसामुळे पहिला दिवस रद्द करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी टॉसही झालेला नाही. शुभमन गिल दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता.

मात्र तो दुसऱ्या कसोटीपूर्वी फिट झाला आहे. हा सराव सामना त्याच्यासाठी उत्तम संधी असणार आहे. आता दुसऱ्या दिवशी खेळ होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हा सराव सामना केवळ २ दिवस खेळला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसासाठी दोन्ही संघांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा सराव सामना ५०-५० षटकांचा खेळवला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे भारतीय फलंदाजांना ५० षटकं फलंदाजी करण्याची संधी मिळेल आणि भारतीय गोलंदाजांना ५० षटकं गोलंदाजी करण्याची संधी मिळेल. त्यामुळे भारतीय खेळाडूंना पिंक बॉलने सराव करण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

आता बँक अकाउंटशिवाय करता येणार UPI पेमेंट; BHIM अ‍ॅपने लाँच केलं नवं फीचर

Gul Chinch Chutney Recipe : गुळ चिंचेची आंबट गोड चटणी, एकदा करुन बघाच

Shocking : हृदयद्रावक! वडिलांची नजर चुकवून ४ वर्षाचा शिवराज ट्रॅक्टरवर चढला, अचानक गिअर पडला अन् थेट...

Poet Death: महाराष्ट्राचा तेजस्वी तारा निखळला! सुप्रसिद्ध कवी यांचे निधन, मराठी साहित्यविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT