India vs Australia Visakhapatnam Match
India vs Australia Visakhapatnam Match  ICC Twitter
क्रीडा | IPL

India vs Australia : टीम ऑस्ट्रेलियाने उडवला धुव्वा; कांगारूंनी ६६ चेंडूत टीम इंडियाला गुंडाळलं

Vishal Gangurde

India vs Australia 2nd ODI 2023: आज विशाखापट्टनममध्ये ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचा सामना रंगला. ३ एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामन्यात टीम इंडियाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाने दिलेल्या ११७ धावांचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने सहज करत सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकून मालिकेत १-१ ची बरोबरी केली आहे. (Latest Marathi News)

विशाखापट्टनमच्या मैदानात टीम ऑस्ट्रेलियाने (Australia) धुव्वादार खेळ दाखवला. ३ एक दिवसीय सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने (Team India) २६ षटकात अवघ्या ११७ धावा केल्या. स्टार्कने टीम इंडियाचे ५ गडी बाद केले.

टीम इंडियाने दिलेल्या अवघ्या ११८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून मार्शने ६६ धावा कुटल्या आणि ट्रेविस हेडने ५१ धावा ठोकत नाबाद राहिला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात लाजिरवाणी झाली. टीम इंडियाचा शुभमन गिल शून्य धावावर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा १३ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवची दुसऱ्या सामन्यातही बॅट तळपळली नाही. हार्दिक पांड्यानेही अवघी एकच धाव केली.

विराट कोहली चांगली फंलदाजी करत होता, मात्र, तोही १६ व्या षटकात बाद झाला. विराट ३५ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. रविंद्र जडेजाने १६ धावा ठोकल्या. कुलदीप यादवने ४ आणि मोहम्मद शमी शून्य धावांवर बाद झाला. स्टार्कने ५ गडी बाद केले. तर सीन एबॉटने १ गडी बाद केला. या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने सामना जिंकून १-१ ने बरोबरी केली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT