भारत - अफगाणिस्तान टी -२० मालिकेचा बिगुल वाजला आहे. या दोन्ही संघांमध्ये ११ जानेवारीपासून ३ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. हा सामना मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
या मालिकेतून विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मासारखे दिग्गज खेळाडू कमबॅक करताना दिसून येणार आहेत. या मालिकेत विराट आणि रोहितला मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. दरम्यान जाणून घ्या कोणत्या ११ खेळाडूंना या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते.
सलामी जोडी..
या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करताना दिसून येईल. त्याला साथ देण्यासाठी यशस्वी जयस्वाल फलंदाजीला येऊ शकतो. ही जोडी भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून देऊ शकते. तर ही जोडी कुठल्याही गोलंदाजी आक्रमणासमोर विस्फोटक फलंदाजी करू शकते. त्यामुळे शुभमन गिलला संघाबाहेर राहावं लागेल.
मध्यक्रम..
तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला येऊ शकतो. तर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी तिलक वर्माला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. या सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. तर सहाव्या क्रमाकांवर
अष्टपैलू खेळाडू...
अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. तो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)
फिरकी गोलंदाज..
या सामन्यात फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.
वेगवान गोलंदाज..
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी -२० सामन्यासाठी मुकेश कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते.
अशी असू शकते प्लेइंग ११ (Team India Playing 11 Prediction):
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.