India vs Afghanistan saam tv
Sports

India vs Afghanistan: हार्दिक पंड्या OUT, कोणत्या खेळाडूची होणार एन्ट्री? पाहा अफगाणिस्ताविरूद्ध्या वनडेसाठी कशी असेल प्लेईंग ११

India vs Afghanistan 1st ODI: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग ११ समोर आली आहे. विराट कोहली आणि हार्दिक पंड्या नसल्याने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नवे संयोजन पाहायला मिळू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे सिरीजमधील पहिला सामना धर्मशालामध्ये खेळवला जाणार आहे. शनिवारी सुरू होणाऱ्या या सिरीजमध्ये टीम इंडिया दमदार सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. यामध्ये काही नव्या खेळाडूंना संधी देऊन भविष्यातील योजना आखण्याचा प्रयत्नही करण्यात येऊ शकतो.

दुसरीकडे, अफगाणिस्तानविरूद्ध भारतासमोर एक मोठं आव्हान उभं असणार आहे. या सिरीजमध्ये हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांच्यासारखे अनुभवी खेळाडू टीममध्ये नसणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाची प्लेईंग ११ कशी असणार आहे हे पाहूयात.

कशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग ११

या सिरीजच्या सुरुवातीच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा ही अनुभवी जोडी डावाची सुरुवात करेल. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेला डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालला काही काळ वाट पाहावी लागू शकते.

या सिरीजमध्ये टीम इंडियाला बसलेला मोठा धक्का म्हणजे विराट कोहली. कोहलीची उणीव टीमला भासू शकते. कोहली टीममध्ये नसल्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत टीम मॅनेजमेंटला नवीन पर्यायांवर अवलंबून राहावं लागणार आहे. डावखुरा विकेटकीपर-फलंदाज इशान किशनची वर्णी तिसऱ्या क्रमांकावर लागण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळानंतर वनडे टीममध्ये परतलेल्या इशानला या संधीचं सोनं करून स्वतःचं स्थान पक्कं करण्याची संधी मिळेल.

इशानने त्याचा शेवटचा वनडे सामना ऑक्टोबर २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील इशानची कामगिरी चांगली राहिलीये. यामुळेच टीम मॅनेजमेंट त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला तिसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची जागा देऊ शकते. जर त्याला संधी मिळाली तर तो टीममध्ये स्थान अधिक पक्कं करू शकतो.

हार्दिकच्या जागी कोणाला मिळणार संधी?

अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी वनडे सिरीजसाठी हार्दिक पंड्या पुन्हा एकदा दुखापतीमुळे टीमबाहेर गेला. क्वाड्रिसेप्स स्ट्रेनमुळे त्याला विश्रांती घ्यावी लागणार असून टीम मॅनेजमेंटला त्याच्या जागी योग्य पर्याय शोधावा लागणार आहे. त्यामुळे ऑलराऊंडरच्या भूमिकेत शिवम दुबे किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते.

कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), इशान किशन, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल / शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

पावसाळ्यात झुरळांचा त्रास वाढलाय? घरातून कायमचे हाकलण्यासाठी लगेचच करा 5 सोपे उपाय

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT