Hardik Pandya Catch Saamtv
Sports

Ind Vs NZ 2nd ODI: हार्दिकचा विषयच हार्ड! एकाच हातात पांड्याने घेतला अफलातून कॅच, विराटही झाला थक्क; Viral Video

पांड्याच्या या जबरदस्त कॅचचा व्हिडिओ खुद्द BCCI ने अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

Gangappa Pujari

Ind vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपुरच्या वीर नारायण सिंग मैदानावर खेळला जात आहे. भारतीय संघाने भेदक मारा करताना अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडलं आहे. ज्यामुळे आता केवळ 109 धावांचे माफक लक्ष्य गाठून भारताला सामना जिंकता येणार आहे.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल तर केलीच, पण सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती हार्दिकच्या जबदस्त कॅचची.. हार्दिकने (Hardik Pandya) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेप मारत असा कॅच घेतला की विराट कोहलीसुद्धा थक्क झाला. या कॅचचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

पहिल्याच ओव्हरमध्ये केली कमाल:

सामन्याच्या 10व्या षटकात हार्दिक पांड्या भारताकडून गोलंदाजी करत होता. पांड्याचे हे पहिलेच षटक होते. तर डेव्हन कॉनवे किवीजची फलंदाजी करत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर ड्वॉन स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण तो पूर्ण ताकदीने शॉट खेळू शकला नाही.

पंड्याने या संधीचा फायदा घेत खाली झेप घेत चेंडू पकडला. चेंडू खूपच कमी असल्याने हा झेल सोपा नव्हता. पण पांड्याने झेप घेत अवघड कॅच पकडला आणि न्यूझीलंडच्या फलंदाजाला 7 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

हार्दिकचा हा कॅच पाहून विराट कोहलीही थक्क झाला. पांड्याच्या या जबरदस्त कॅचचा व्हिडिओ खुद्द बीसीसीआयने (BCCI) अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया देताना हार्दिकच्या अफलातून खेळीचे कौतुक केले आहे.

गोलंदाजांनी केली कमाल:

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांची कमाल पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात भारतीय संघ वर्चस्व गाजवताना दिसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने किवी सलामवीर फिन ऍलनला क्लीन बोल्ड केले.

मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली सर्वच गोलंदाजांनी न्यूझीलंडचे अक्षरशः कंबरडे मोडले. या सामन्यात मोहम्मद शमीने तीन, तर वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून जी ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Bhendi Recipe : कुरकुरीत अन् झणझणीत भरली भेंडी, चव अशी की खातच राहाल

Maharashtra Live News Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परतीच्या पावसाचा धुडगूस

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुण्याच्या घरात आयुष्य संपवलं

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT