Men’s U19 Asia Cup Team: Saamtv
Sports

Under -19 आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा! नाशिकच्या खेळाडूला मिळाली संधी; कर्णधार कोण?

Men’s U19 Asia Cup Team: UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

India U19 squad for ACC Men’s U19 Asia Cup

आगामी अंडर १९ आशिया कप २०२३ स्पर्धेचा थरार यूएईमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर (शनिवार) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने १५ सदस्यांची यादी जाहीर केली. अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत पंजाबचा उदय सहारन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यामध्ये नाशिकचा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी व बीडचा सचिन धस यांनाही संधी देण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कनिष्ठ निवड समितीने UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या आगामी आशियाई क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या १९ वर्षाखालील संघाची निवड केली आहे. गतविजेता भारत हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघामध्ये महाराष्ट्रातील दोन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

ज्यामध्ये अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी व सचिन धस यांचा समावेश आहे. तसेच मुंबईचा अष्टपैलू व सर्फराज खानचा भाऊ मुशीर खान याला देखील संघात संधी मिळाली आहे. ही स्पर्धा 8 डिसेंबरपासून युएई येथे खेळली जाईल. आत्तापर्यंत भारताने ८ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. भारताच्या अंडर-19 संघात १५ खेळाडूंना स्थान देण्यात आले असून, ३ खेळाडूंना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. निवड समितीने ४ अतिरिक्त राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

असा आहे १९ वर्षाखालील भारतीय संघ..

अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

स्टँडबाय खेळाडू: प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन.

राखीव खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vertical Property Card: सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक फ्लॅट मालकाला मिळणार ‘ खास कार्ड’, काय आहेत फायदे?

Waking up at 3am: रात्री नेमकी ३ वाजताच जाग येते? कारणं जाणून घ्या आत्ताच

Maharashtra News Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणूक सार्वजनिक सुट्टी, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

Bigg Boss Marathi 6 : थेट घराबाहेर पडणार 'हा' सदस्य, टॉप ५ च्या शर्यतीतून विजेतेपदाचा तगडा स्पर्धक OUT

SCROLL FOR NEXT