Tulika Maan, Common Wealth Games 2022, Judo, India, Birmingham
Tulika Maan, Common Wealth Games 2022, Judo, India, Birmingham Saam Tv
क्रीडा | IPL

Tulika Maan : वडिलांच्या खूनानंतर सावरली तुलिका मान; बर्मिंगहॅमला तिरंगा फडकल्याचा आनंद, पण...

Siddharth Latkar

Tulika Maan : बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Common Wealth Games 2022) भारतीय (india) ज्युदाेपटू तुलिका मान (Tulika Maan) हिने राैप्यपदक (silver medal) पटकाविलं आहे. दरम्यान या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करु शकले नाही त्यामुळे याची मला खंत असल्याचे तुलिका मान हिने नमूद केले. तुलिका म्हणाली हे पदक मी माझी आई व प्रशिक्षकांना समर्पित करीत आहे. (India At Common Wealth Games)

तुलिकाने ७८ किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या सिडनी अँड्र्यूजचा पराभव करून अंतिम फेरी गाठली हाेती. तुलिकास सुवर्णपदकाच्या लढतीत स्कॉटलंडच्या सारा अॅडलिंग्टन (Sarah Adlington) हिच्याकडून पराभव स्विकारावा लागला. तुलिका म्हणाली आजच्या सामन्यात माझ्यावर काेणताही दबाव नव्हताे. प्रतिस्पर्धी खेळाडू सारा ही आक्रमक खेळत हाेती. मला तिचा प्रतिकार करता आला नाही अशी खंत तिने व्यक्त केले. माझ्या प्रशिक्षकांनी माझा सराव उत्तम पद्धतीने करुन घेतला. आगामी काळात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न राहिल असेही तुलिकानं नमूद केले. (Tulika Mann News)

तुलिका मान हिला लहानपणापासून क्रीडा क्षेत्राची आवड आहे. तिचे बालपण संघर्षमय गेलं आहे. तुलिका हि चाैदा वर्षांची असताना व्यावसायिक खून्नशीतून तिचे वडील सतबीर मान यांचा खून झाला हाेता. त्यामुळे काही काळ तिने ज्युदाेतून विश्रांती घेतली हाेती. तुलिकाचे पालनपोषण तिच्या आईने केले. तिची आई दिल्ली पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून तुलिकाने सावरत आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. सन (2018) मध्ये तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेणे कठीण झालं. तुलिकाने चार वेळा राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT