T20 World Cup 2026 Top 20 Team saam tv
Sports

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्डकप 2026 साठी पात्र ठरलेल्या टीम्स कोणत्या? पाहा 20 टीम्सची संपूर्ण यादी

T20 World Cup 2026 Top 20 Team: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे! भारत (India) आणि श्रीलंका संयुक्तपणे आयसीसी पुरुष टी२० वर्ल्डकप २०२६ (ICC Men's T20 World Cup 2026) चे आयोजन करणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आयसीसी मेन्स टी 20 वर्ल्ड कप 2026 चं आयोजन भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व टीम्सची नावं अधिकृतपणे समोर आली आहेत. शेवटच्या क्षणी संयुक्त अरब अमिरात (UAE) या टीमने उत्तम कामगिरी करत वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. मोहम्मद वसीम यांच्या नेतृत्वाखालील यूएई टीमने जपानवर विजय मिळवत टी20 वर्ल्ड कपमध्ये आपली जागा निश्चित केली.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या टॉप 20 टीम्सची निवड अनेक क्वालिफिकेशन फेऱ्यांमधून झाली आहे. भारत आणि श्रीलंका हे यजमान असल्यामुळे त्यांना थेट प्रवेश मिळाला आहे. त्याचबरोबर 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टॉप 7 मध्ये स्थान मिळवलेल्या टीम्सनाही थेट 2026 वर्ल्ड कपमध्ये स्थान देण्यात आलंय. या टीम्समध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्टइंडीज यांचा समावेश आहे.

यानंतर, आयसीसी टी 20 टीम रँकिंगमध्ये चांगलं स्थान मिळवलेल्या तीन टीम्सनाही वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली. यात आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या टीम्सचा समावेश आहे. क्वालिफायर स्पर्धांमधूनही अनेक टीम्सने आपली कामगिरी सिद्ध केली. अमेरिकन क्वालिफायरमधून कॅनडाने प्रवेश मिळवला.

युरोपियन क्वालिफायरमधून इटली आणि नेदरलँड यांनी जागा पक्की केली. आफ्रिकन क्वालिफायरमधून नामिबिया आणि झिम्बाब्वे या टीम्स पुढे आल्या आहेत. तर आशिया/EAP क्वालिफायरमधून नेपाळ, ओमान आणि यूएई या टीम्सने पात्रता मिळवली.

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरलेले देश

भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्टइंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँड, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि यूएई.

अंदाजानुसार, टी 20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होऊ शकते आणि अंतिम सामना 8 मार्चला खेळला जाऊ शकतो. मात्र सध्या भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेचं अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. 16 ऑक्टोबर रोजी यूएईने क्वालिफाय केल्यानंतर आता सर्व 20 संघ निश्चित झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni Photos: पारंपारिक साडी अन् सौंदर्य, सोनाली कुलकर्णीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

Corruption Exposed : २.६२ कोटींची रोकड, ९ फ्लॅट अन् लक्झरी गाड्या; सरकारी अधिकाऱ्याला CBI ने लाच घेताना रंगेहात पकडले

Kamali: कमळी आणि सरोजची होणार तुरुंगात भेट? 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

कल्याण - डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली; शरद पवार गटातील बडा नेता गळाला लागला

SCROLL FOR NEXT