INDIA TO HOST 2030 COMMONWEALTH GAMES AFTER 20 YEARS; AHMEDABAD ANNOUNCED AS VENUE saam tv
Sports

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

India to Host 2030 Commonwealth Games: भारतात २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणार आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेच्या बैठकीत औपचारिक मान्यता देण्यात आलीय. जागतिक बहु-क्रीडा केंद्र बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील हे एक मोठे पाऊल आहे.

Bharat Jadhav

  • २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भारताकडे

  • अहमदाबादमध्ये स्पर्धांचे आयोजन होणार

  • ग्लासगो येथील बैठकीत भारताला अधिकृत मान्यता देण्यात आलीय.

२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आलंय. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. भारतातील अहमदाबादमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. जागतिक बहु-क्रीडा केंद्र बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेमधील हे एक मोठे पाऊल आहे.

२० वर्षांनंतर भारत भूषवणार यजमानपद

भारताने शेवटचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१० मध्ये दिल्ली येथे आयोजित केल्या होत्या. यावेळी ही स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहे. शहरात गेल्या दशकात क्रिडा पायाभूत सुविधा वेगाने विकसित झाल्या आहेत. २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बोलीमध्ये भारत नायजेरियातील अबुजा या देशाशी स्पर्धा करत होता. २०३४ होणाऱ्या स्पर्धा आफ्रिकन देशात आयोजित केल्या जातील, राष्ट्रकुल क्रीडा संघटनेने निर्णय घेतलाय.

दरम्यान २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुमारे ७०,००० कोटी रुपये खर्च झाले होते. जे सुरुवातीच्या अंदाजापेक्षा अनेक पट जास्त होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना प्रासंगिक ठेवणे आणि यजमान शोधणे हे गेल्या काही वर्षांपासून आव्हानात्मक राहिलंय. या स्पर्धेत ७२ देशांचे खेळाडू सहभागी होतात.

स्पर्धांसाठी अहमदाबादमध्ये तयारी सुरू

गेल्या काही महिन्यांत अहमदाबादने कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप, आशियाई अ‍ॅक्वाटिक्स चॅम्पियनशिप आणि एएफसी अंडर-१७ आशियाई कप क्वालिफायर्स सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप येत्या काळात आयोजित केल्या जातील. सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हमध्ये एक मोठे कॉम्प्लेक्स विकसित केले जातंय.

यात जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, एक जलचर केंद्र, एक फुटबॉल स्टेडियम आणि इनडोअर एरिना असणार आहे. या कॉम्प्लेक्समध्ये ३,००० खेळाडूंसाठी एक ऐथिलीट व्हिलेज देखील बांधले जाणार आहे.

२०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मर्यादित बजेट ठेवण्यात आलाय. यात फक्त १० खेळांचा समावेश करण्यात आलाय. यात कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन आणि हॉकी या खेळांना यातून वगळण्यात आले आहे. ज्याचा भारताने तीव्र विरोध केला होता. परंतु आयओएने स्पष्ट केले आहे की भारत २०३० च्या खेळांमध्ये सर्व पदक विजेते खेळ समाविष्ट करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

SCROLL FOR NEXT