Team India For England Test Series : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची निवड झाली आहे. शुभमन गिल याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपद सोपण्यात आले आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितीने आज इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. मुंबईकर श्रेयस अय्यर आणि सरफराज खान यांना स्थान मिळाले नाही.
पहिल्यांदाच कुणाला संधी ?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा चोपणाऱ्या साई सुदर्शन याला टीम इंडियात स्थान दिलेय. अभिमन्यू ईश्वरन यालाही टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.
शामी बाहेर, शार्दुल आत
१७ जणांच्या चमूची निवड करताना अनुभवी मोहम्मद शामी याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर शार्दूल ठाकूर याचे टीम इंडियात कमबॅक झाले आहे. त्याशिवाय आकाशदीप आणि प्रसिद्ध कृष्ण यालाही स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), यशस्वी जायस्वाल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करूण नायर, नितीशकुमार रेड्डी, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्ण, मोहम्मद सिराज, आकाशदीप, अर्शदीप, कुलदीप यादव
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक :
पहिला कसोटी सामना:
तारीख: 20 जून - 24 जून 2025
स्थळ: हेडिंग्ले, लीड्स
दुसरा कसोटी सामना:
तारीख: 26 जून - 30 जून 2025
स्थळ: एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरा कसोटी सामना:
तारीख: 10 जुलै - 14 जुलै 2025
स्थळ: लॉर्ड्स, लंडन
चौथा कसोटी सामना:
तारीख: 23 जुलै - 27 जुलै 2025
स्थळ: ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवा कसोटी सामना:
तारीख: 31 जुलै - 4 ऑगस्ट 2025
स्थळ: द ओव्हल, लंडन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.