इंडियन प्रीमियर लीग २०२४ नंतर टी२० विश्वकप २०२४ होणार आहे. या स्पर्धेत अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडून संयुक्तपणे वर्ल्डकप आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेत २० संघ सहभाग घेणार आहेत. या टूर्नामेंटसाठी एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात १५ भारतीय खेळाडूच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. आयसीसीने सबमिशनची कट ऑफ डेट १ मे ठेवली आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने वृत्तसंस्थेला ही माहिती दिलीय. (Latest News)
या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व संघ २५ मेपर्यंत त्यांच्या सुरुवातीच्या संघात बदल करू शकतात. पीटीआयच्या अहवालानुसार, “भारतीय संघाची निवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केली जाईल, तोपर्यंत आयपीएलचा पहिलं संत्र संपेल.त्यादरम्यान राष्ट्रीय निवड समिती संघाच्या फॉर्म आणि फिटनेसचे मूल्यांकन करेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार,'आयपीएलमधील लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर काही क्रिकेटर्सची पहिली तुकडी १९ मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होईल. ज्या खेळाडूंचे संघ अंतिम ४ साठी पात्र ठरू शकले नाहीत ते लवकर जातील. गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही असाच प्रकार घडला होता.युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या स्पर्धांसाठी काही खेळाडू स्टँडबायवर असतील.
विराट कोहलीला २०२४ च्या टी- २० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळू शकते. आयपीएल २०२४ मध्ये विराट चांगली कामगिरी करत आहे. त्याने ३ पैकी २ सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. विराट टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ११७ सामन्यांच्या १०९ डावात ४ हजार ३७ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ३७ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे.
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा ११४१ करणारा फलंदाज देखील कोहली आहे.दरम्यान विराट कोहली सध्या आयपीएल २०२४ चा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला आहे. त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. तरीदेखील बीसीसीआयचे निवडसमिती सदस्य चिंतेत असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु कोहलीला भारतीय संघातून वगळणे अशक्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.