T20 World Cup 2026 India Squad Announce Saam TV Marathi News
Sports

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

India Squad for T20 World Cup 2026 Announced: टी२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात १५ खेळाडूंची निवड झाली.

Namdeo Kumbhar

T20 World Cup 2026 India Squad Announcement Live : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात १५ शिलेदारांची नावे आज जाहीर करण्यात आली. शुभमन गिल आणि जितेश शर्मा यांना १५ जणांच्या संघात स्थान मिळालेले नाही. तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती यांच्याह १५ जणांची निवड करण्यात आली आहे. अजित आगरकर आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाची घोषणा केली. मुंबईकर श्रेयस अय्यर, जितेश शर्मा, नितीशकुमार रेड्डी, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत यांना १५ जणांच्या चमूमध्ये स्थान मिळाले नाही. (Suryakumar Yadav to Lead India in T20 World Cup 2026 as BCCI Names Strong Squad)

भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये २०२६ चा टी२० विश्वचषक होणार आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या दरम्यान विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. २० या स्पर्धेत २० संघ ४ गटात विभागण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ७ फेब्रुवारीला भारत आणि अमेरिका संघात होईल.

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ -

सूर्यकुमार यादव (कर्णधार)

अभिषेक शर्मा

हार्दिक पांड्या

शिवम दुबे

तिलक वर्मा

संजू सॅमसन (विकेटकीपर)

इशान किशन (विकेटकीपर)

रिंकू सिंह

वरूण चक्रवर्ती

कुलदीप यादव

अक्षर पटेल (उपकर्णधार)

वॉशिंगटन सुंदर

जसप्रीत बुमराह

अर्शदीप सिंह

हर्षित राणा

मुख्य कोच - गौतम गंभीर

टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे वेळापत्रक

७ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध अमेरिका, मुंबई

१२ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली

१५ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो

१८ फेब्रुवारी २०२६ - भारत विरुद्ध नेदरलँड्स, अहमदाबाद

टी २० विश्वचषकाचे स्वरूप कसं असेल ?

२०२६ मध्ये होणारा टी२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेत २० संघ ४ गटात विभागण्यात आले आहेत. साखली फेरीनंतर प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. या ८ संघाचे दोन गटात विभागण्यात येतील. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहचतील. सेमीफायनलमधील दोन विजेते संघ फायनल खेळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT