India Vs West Indies T20 series Rohit Sharma Virat Kohli SAAM TV
क्रीडा

India Vs West Indies T20 series : टीम इंडियाची घोषणा; विराट, बुमराह नाही, असा असेल संघ!

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर केला असून, कुणाला संधी, कुणाला विश्रांती वाचा सविस्तर

Nandkumar Joshi

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची ही मालिका होत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच लेग स्पिनर युजवेंद्र चहल यालाही निवड समितीनं विश्रांती दिली आहे. तर केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, दोघांनाही तंदुरुस्त झाल्यानंतर संघात घेण्यात येणार आहे. (India Vs West Indies T20 series)

दुसरीकडे, फिरकी गोलंदाज आर अश्विन याचीही टी-२० संघात वापसी झालेली आहे. आर अश्विनला टी-२० वर्ल्डकपनंतर टी-२० संघात घेतलं नव्हतं. रोहित शर्मा कर्णधार असेल. तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) हे दोघे संघात असतील.

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होत आहे. २९ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होईल. त्याआधी वनडे मालिका खेळवली जाईल. वनडे मालिकेतील पहिला सामना हा २२ जुलैला खेळवण्यात येईल.

वेस्ट इंडिजविरुद्ध टी २० मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

भारत-विंडीज वनडे मालिका वेळापत्रक

पहिला वनडे सामना २२ जुलैला पोर्ट ऑफ स्पेनमध्ये होईल.

दुसरा वनडे सामना २४ जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये होईल.

तिसरा वनडे सामना २७ जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेनमध्येच होईल.

टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना - २९ जुलै - त्रिनिनाद

दुसरा सामना - १ ऑगस्ट - सेंट किट्स

तिसरा सामना - २ ऑगस्ट - सेंट किट्स

चौथा सामना - ६ ऑगस्ट - लॉन्डरहिल

पाचवा सामना - ७ ऑगस्ट - लान्डरहिल

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे -

शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT