टीम इंडियामध्ये वनडे फॉर्मेटमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. वनडे फॉर्मेटच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला काढून टाकण्यात आलंय. तर ही धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. विराट कोहली आणि रोहित यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वनडे स्थान देण्यात आलं आहे. मात्र, या सिरीजमध्ये रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार नाही. त्यांच्या ऐवजी गिलवर भारतीय वनडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलंय.
भारत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तीन वनडे आणि पाच टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. या सिरीजसाठी टीम इंडियाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. अहमदाबादमध्ये झालेल्या निवड समितीच्या बैठकीत टीम सिलेक्शनवर सखोल चर्चा झाली. या बैठकीत शुभमन गिलला टेस्टनंतर आता वनडे संघाचेही नेतृत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला.
वनडे संघात गिलला कर्णधार बनवण्यात आलं असून श्रेयस अय्यरची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना टीममध्ये जागा देण्यात आली आहे. मात्र दोघांनाही विशेष फलंदाज (स्पेशालिस्ट बॅटर) म्हणून स्थान मिळालंय. दरम्यान, टी20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडेच कायम ठेवण्यात आले आहे.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), यशस्वी जायस्वाल
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक सर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर
१९ ऑक्टोबर - पर्थ
२३ ऑक्टोबर - एडिलेड
२५ ऑक्टोबर - सिडनी
२९ ऑक्टोबर - Canberra
३१ ऑक्टोबर - मेलबर्न
२ नोव्हेंबर - Hobart
६ नोव्हेंबर - गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर - ब्रिसबेन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.