blind ironman triathlete niket dalal x
Sports

Death : देशातील पहिले नेत्रहीन ट्रायथलीट निकेत दलाल यांचे आकस्मिक निधन; हॉटेल पार्किंगमध्ये सापडला मृतदेह, मृत्यूचे कारण...

Chhatrapati Sambhajinagar : देशातील पहिले नेत्रहीन आयर्नमॅन ट्रायथलीट निकेत श्रीनिवास दलाल यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे.

Yash Shirke

भारताचे पहिले नेत्रहीन आयर्नमॅन निकेत श्रीनिवास दलाल यांचे निधन झाले आहे. १ जुलै रोजी सकाळी त्यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये आढळला. निकेत दलाल हे हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याचे तपासातून समोर आले आहे. हा अपघात इतका गंभीर होता की, खाली पडल्यानंतर निकेत यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जूनच्या रात्री निकेत यांच्या घराला अचानक आग लागली. मित्रांनी निकेत यांना घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले. मित्रांच्या सल्ल्याने निकेत यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. रात्री अडीच वाजता ते हॉटेलमध्ये पोहोचले. ही रात्र त्यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरेल यांची कोणालाही कल्पना नव्हती. सकाळी ८ च्या सुमारास हॉटेल कर्मचाऱ्यांना निकेत यांचा मृतदेह पार्किंगमध्ये आढळला. निकेत यांचा मृत्यू अपघातामुळे झाला असे म्हटले जात आहे.

२०२० मध्ये निकेत दलाल यांनी आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉन पूर्ण केले होते. ट्रायथलॉनमध्ये १.९ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी रनिंग यांचा समावेश आहे. ही कामगिरी करणारे निकेत दलाल हे भारतातील पहिले आणि जगातील पाचवे नेत्रहीन ट्रायथलीट आहेत. ते स्पीच थेरपिस्ट होते. याशिवाय त्यांना अनेक खेळात रस होता.

२०१५ मध्ये ग्लूकोमा नावाच्या एका आजाराने निकेत यांची दृष्टी गेली होती. अंधत्त्वावर मात करत निकेत दलाल यांनी लक्षणीय कामगिरी केली. आयर्नमॅन ट्रायथलॉन व्यतिरिक्त निकेत यांनी राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहे. निकेत यांच्या आई लता दलाल या छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर होत्या. निकेत दलाल यांच्या निधनामुळे क्रीडा जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Tourism : जालना येथील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण, ट्रेकिंगसाठी ठरेल बेस्ट

Gautami Patil : कातिल अदा अन् ग्लॅमरचा तडका; मार्केटमध्ये गौतमी पाटीलचं नवीन गाणं आलंय, पाहा VIDEO

EPFO New Rule: पीएफची २ महिन्याची 'ती' अट रद्द, EPFO ने घेतला मोठा निर्णय, नव्या नियमाचा तुम्हाला किती फायदा?

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

Solapur-Mumbai Flight : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून सुरु होणार सोलापूर-मुंबई विमानसेवा | VIDEO

SCROLL FOR NEXT