India’s glorious Asia Cup victory overshadowed by trophy drama involving Pakistan’s Mohsin Naqvi Saam Tv
Sports

India Pakistan Asia Cup Final: पाकिस्तानचा मंत्री ट्रॉफी घेऊन पळाला, भारताच्या विजयानंतर नेमकं काय घडलं?

Mohsin Naqvi Trophy Snatching Incident: भारतानं ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप मॅचमध्ये ऑपरेशन तिलक राबवलंय... भारतानं पाकिस्तानी संघाचा धुव्वा उडवलाय...मात्र पाकिस्तानी मंत्री आशिया कपची ट्रॉफी घेऊन का पळाला? भारताच्या विजयानंतर नेमकं काय घडलं?

Suprim Maskar

आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा पाच गडी राखून धुव्वा उडवला... मात्र फायनलइतकाच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरलाय.. आशिय कपच्या फायनलनंतर ट्रॉफी देण्यावरून राडा झाला.. त्यावेळी नेमकं काय घडलं

टीम इंडियाच्या विजयानंतर काय घडलं?

आशिया चषकात पाकला हरवल्यानंतर दुबईत दीड तास ड्रामा

भारतीय संघाचा मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी आणि वैयक्तिक मेडल स्वीकारण्यास नकार

ACCचे अध्यक्ष मोहसीन नक्वी पाकिस्तानचे गृहमंत्री आणि PCBचे अध्यक्ष

भारतीय संघाच्या निर्णयानंतरही मोहसीन नक्वींचा ट्रॉफी देण्यासाठी हट्ट

मोहसीन नक्वी ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंचे मेडल घेऊन मैदानातून बाहेर

दरम्यान ट्रॉफी मिळाली नसली तरी भारतीय संघानं जेतेपदाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. सूर्यकुमार यादवने हातात प्रतिकात्मक ट्रॉफी असल्याचे हावभाव करत हात उंचावून विजयाचा जल्लोष साजरा केला..दुसरीकडे पराभवानंतर पाकिस्तानी नागरिकही पाक टीमवर चांगलेच संतापलेत... पाकिस्तानी चाहत्यांनी थेट पाक टीमचे वाभाडेच काढलेत... तर भारतीय क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला...

दहशतवादी हल्ल्यावरून आणि अहमदाबाद विमान दुर्घटनेवरून भारतीय संघाला मैदानात डिवचणाऱ्या पाकड्यांना या सामन्यातून चांगलचं प्रत्त्युत्तर मिळालयं.. त्यात भारताविरोधी गरळ ओकणाऱ्या मोहसीन नक्वीकडून भारतीय संघानं ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानं पाकिस्तानला चांगलंच झोंबलंय... किमान यापुढे तरी पाक टीमनं आपले नापाक कारनामे खेळाच्या मैदानात दाखवू नये, त्याऐवजी मैदानात प्रतिस्पर्ध्यासोबत खेळासाठी आणखी तयारी करावी.. अन्यथा भविष्यात टीम इंडिया पाक टीमचं क्रिकेटमधील उरलसुरलं अस्तित्वचं कायमचं नामशेष करून टाकेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...

2026 मध्ये WhatsApp चॅटिंगचा अंदाज बदलणार; जे लिहू त्याचा Sticker बनेल, आताच जाणून घ्या 3 स्मार्ट फीचर्स

मुदत संपली,आता HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? खर्च किती होणार? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: 'ज्याने मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक, महापाप केलं तो महापौर', देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT