गुवाहाटीमध्ये भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला व्हाईट वॉश दिला आहे. अवघ्या १४० रन्सवर टीम इंडिया ऑल आऊट झाली आहे. तब्बल ४०८ रन्सने भारताचा पराभव केला आहे.
गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला अक्षरशः लोळवलंय. ५४९ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला १५० रन्स करण्यासाठी संघर्ष करावा लागला. टीममधील दिग्गज खेळाडू या सामन्यात अपयशी ठरताना दिसले. आफ्रिकन टीमने भारताचा ४०८ इतक्या मोठ्या फरकाने भारताचा पराभव केला.
भारतात येऊन विरोधी टीमकडून पराभव पत्करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गंभीरच्या कारकिर्दीत ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडने ३ टेस्ट सामन्यांच्या सिरीजमध्ये क्लीन स्विप करून इतिहास रचला होता. तर आता दक्षिण आफ्रिकेनेही त्यांना पराभूत केलंय. दुसऱ्या डावात ५४९ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करणारी टीम इंडिया अवघ्या १४० रन्सवर ढेपाळली. २० रन्सपेक्षा जास्त रन्स करून अर्धशतक ठोकणारा जडेजा एकमेव फलंदाज होता. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने सहा विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेने भारताला तब्बल २५ वर्षांनी व्हाईट वॉश दिला आहे. २००० साली हेन्सी क्रोनिएच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने भारताला २-० असं पराभूत करत व्हाईट वॉश दिला होता. तर आता २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला २ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये भारताला पराभूत केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.