India vs Zimbabwe saam tv
Sports

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा 7 विकेट्सने केला पराभव

India vs Zimbabwe: भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 7 विकेट्सने दमदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. वैभव सूर्यवंशीच्या 18 चेंडूत अर्धशतकासह मयंक यादवच्या प्रभावी गोलंदाजीमुळे टीम इंडियाने 126 धावांचं लक्ष्य सहज गाठलं.

Surabhi Jayashree Jagdish

भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 सिरीजची सुरुवात विजयाने केली. पहिल्याच सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून झिम्बाब्वेचा पराभव करत सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. 126 रन्सचं लक्ष्य टीम इंडियाने अवघ्या 13.2 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. या विजयाचा खरा हिरो युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ठरला. त्याच्या तुफानी अर्धशतकामुळे भारताने सामना सहज सामना आपल्या नावावर केला. सिरीजमधील दुसरा सामना आता 25 जुलै रोजी खेळवला जाणार आहे.

वैभव सूर्यवंशीची आक्रमक फलंदाजी

भारताच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करत केली. मात्र अभिषेक शर्मा अवघ्या एका रनवर बाद झाला. त्यानंतर वैभवने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई करत केवळ 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं. मात्र अर्धशतक पूर्ण केल्यानंतरच्या पुढच्याच चेंडूवर त्याची खेळी संपुष्टात आली. दुसऱ्या बाजूला ईशान किशननेही टीमला चांगली साथ दिली. त्याने 24 बॉल्समध्ये 35 रन्स करताना 3 चौकार आणि 2 सिक्स लगावलेत.

याआधी टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेचा डाव 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 125 रन्सवर आटोपला. वेस्ले मधेवेरेने सर्वाधिक 39 रन्सची खेळी केली. भारताकडून मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत झिम्बाब्वेच्या फलंदाजीवर लगाम घातला. शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनीही प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना चांगली साथ दिली.

सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अशोक शर्माने भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारताला पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. मयंक यादवने ब्रायन बेनेटला ईशान किशनकरवी कॅच आऊट केलं. त्यानंतर प्रिन्स यादवने बेन करनला बाद केलं.

मयंक यादवने पुन्हा एकदा अचूक मारा करत डायोन मायर्सला बाद केले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने चेंडू थेट शिवम दुबेच्या हातात मारला. मायर्सला 14 चेंडूत केवळ 6 रन्स करता आले. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा देखील फार काळ टिकू शकला नाही. तो फक्त 4 रन्स करून शिवम दुबेच्या गोलंदाजीवर बाद झाला.

रवी बिश्नोईने भारताला आणखी एक महत्त्वाचं यश मिळवून दिलं. रायन बर्ल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ तिलक वर्माच्या अप्रतिम कॅचचा शिकार ठरला. बर्लने 35 चेंडूत 26 रन्स केले. मात्र त्याची खेळी टीमला मोठ्या स्कोरपर्यंत पोहोचवू शकली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा यलो अलर्ट

नाशिकमधील परिस्थिती बिकट! गोदावरीने ओलांडली धोका पातळी; 'या' गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने खळबळ

ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा 'भाताचा फेसपॅक', कोरडी, रखरखीत त्वचा होईल मऊ- मुलायम

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर, ८० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र; तुमचं नाव यादीत आहे का?

Ramayana : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर रिलिज होणार इतक्यात..., २४ तास आधी निर्मात्याचा मोठा निर्णय; कारण काय?

SCROLL FOR NEXT