KL rahul and athiya shetty  Saam Tv
Sports

KL Rahul : मुलगी झाली रे... केएल राहुल बनला बाबा, अथिया शेट्टीने दिला मुलीला जन्म

KL Rahul And Athiya Shetty : भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलला कन्यारत्न लाभले आहे. त्याची पत्नी अथिया शेट्टीने मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी सर्वांना दिली.

Yash Shirke

KL Rahul Athiya Shetty Baby Girl : आयपीएल २०२५ च्या सुरुवातीलाच एक गोड बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. राहुलची पत्नी अथिया शेट्टीने आज, २४ मार्च रोजी मुलीला जन्म दिला आहे. राहुल आणि अथिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

"Blessed With A Baby Girl" असे म्हणत राहुल आणि अथिया यांनी बाळाच्या आगमनाची घोषणा केली आहे. या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी नव्या आई-बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा विवाह झाला होता. आज त्यांनी आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले.

अथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. तिने बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यावेळेसअथिया शेट्टी आणि केएल राहुल एकमेकांना डेट करत होते. काही वर्ष डेट केल्यानंतर २३ जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता.

आयपीएल २०२५ मध्ये केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. आज विशाखापट्टणममध्ये दिल्ली आणि लखनऊचा सामना खेळला जात आहे. अथिया शेट्टी गरोदर असल्याने केएल राहुल मुंबईत थांबला होता. बाळाच्या जन्माच्या वेळी मुंबईत राहण्याचा राहुलने निर्णय घेतला होता. राहुल आणि अथिया यांनी बॉलिवूड आणि क्रिकेट दोन्ही विश्वातील लोक शुभेच्छा देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural BP Control : उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी जीवनशैलीत काय बदल करावेत?

Maharashtra Live News Update: खारघरमध्ये माजी नगरसेविकांचं ठिय्या आंदोलन

Wheat Chocolate Cake: मैदा नाही तर गव्हाच्या पीठापासून मुलांसाठी बनवा हेल्दी चॉकलेट केक, वाचा सोपी रेसिपी

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT