
Aasif Sheikh Fall ill on Bhabhiji Ghar Par Hain Shoot: लोकांना अजूनही प्रत्येक घरात 'भाभी जी घर पर हैं' हा प्रसिद्ध टीव्ही शो पहायला आवडतो. या मालिकेची कथा दोन शेजारील पुरूषांबद्दल आहे जे एकमेकांच्या पत्नीसाठी वेडे आहेत आणि भाभीसोबत फ्लर्ट करण्याची एकही संधी सोडत नाहीत. २०१५ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झालेली ही मालिका आता चित्रपटात रूपांतरित होणार आहे आणि त्याच्या शूटिंग सेटवरून एक मोठी बातमी समोर आली आहे. विभूती नारायणची भूमिका साकारणारा आसिफ शेख शूटिंग दरम्यान आजारी पडला आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याचे वृत्त आहे.
'भाभीजी घर पर हैं' या चित्रपटात विभूती नारायण मिश्राची भूमिका साकारणारा आसिफ शेख शूटिंग दरम्यान गंभीर आजारी पडला, अशी बातमी समोर आली आहे. एका फायटिंग सीनचे शूटिंग करताना, आसिफ शेखची तब्येत बिघडली आणि तो सेटवर बेशुद्ध पडला.
सेटवर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर, अभिनेत्याला उपचारासाठी मुंबईत आणण्यात आले. दरम्यान, अद्याप शोच्या टीम आणि अभिनेत्याकडून त्यांच्या तब्येतीबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. चाहते आसिफ शेखच्या प्रकृतीची चिंता करत असून लवकर बरे होण्याची आशा करत आहेत.
आसिफ शेख हा टीव्ही तसेच बॉलिवूडच्या जगातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. करणने अर्जुन, हम लोग सारख्या अनेक चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे. दरम्यान, 'भाभी जी घर पर हैं' या शोमुळेच आसिफ शेखला लोकांमध्ये ओळख मिळाली. विभूती नारायण मिश्रा ही त्यांची व्यक्तिरेखा पाहून लोकांनी त्याचे खूप कौतुक केले. १० वर्षांपासून सुरू असलेला हा शो आता मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.