Sports

IND vs ENG U19 World Cup Final: भारताचं 'वैभव'! इंग्लंडला लोळवून टीम इंडिया ठरली वर्ल्ड चॅम्पियन, विश्वविजेतेपदाचा षटकार

IND vs ENG U19 World Cup Final: भारतीय संघाने याआधी 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये हा अंडर 19चा वर्ल्ड कप जिंकलाय.

Bharat Jadhav

वैभव सूर्यवंशीची तोडफोड बॅटिंग, ८० चेंडू, १७५ धावा, त्यात १५ षटकार, १५ चौकार, आयुष म्हात्रेची कर्णधारपदाला साजेशी फिफ्टी आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेला खोचक मारा या जोरावर भारताच्या अंडर १९ संघानं विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंड संघाला १०० धावांनी मात दिली.

आयसीसी पुरुष १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा शानदार विजय मिळवला. हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. वैभव सूर्यवंशी (१७५) च्या धमाकेदार खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे आव्हान ठेवलं होतं.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवर गारद झाला. यासह भारतीय संघाने विक्रमी सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची शानदार खेळी केली, तर भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेनेही शानदार अर्धशतक झळकावले.

दरम्यान भारतीय संघाने दिलेल्या डोंगराएवढ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली राहिली नाही. जोसेफ मूर्स (१७ धावांवर बाद झाला. त्यानंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. खिलान पटेलने मेसला बाद करून ही भागीदारी मोडली. मेसने २७ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह ४५ धावा केल्या. भारतीय संघाला तिसरी विकेट थॉमस रेवच्या रुपात मिळाली. त्याने ३१ धावा केल्या. यानंतर, बेन डॉकिन्स ५६ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावांची खेळी खेळून बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT