IND vs NZ 2nd ODI saam tv
Sports

IND vs NZ 2nd ODI: पावसाचा खेळ, न्यूझीलंडचा गेम; अटीतटीच्या सामन्यात हरता हरता जिंकली टीम इंडिया

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आलेला दुसरा वनडे सामना पावसामुळे थांबवण्यात आला. DLS नियमानुसार टीम इंडियाने ४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला पावसाची साथ मिळाली. एकीकडे भारतीय फलंदाजांना १३५ धावांचं छोटं लक्ष्य गाठतानाही नाकीनऊ आल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे सामना थांबवावा लागला. अखेर डकवर्थ लुईस (DLS) नियमानुसार टीम इंडियाला ४ रन्सने विजयी घोषित करण्यात आलं. सामना थांबला तेव्हा भारताने २६ ओव्हर्समध्ये ७ विकेट गमावत ११३ रन्स केले होते. या विजयासह भारताने सिरीजमध्ये २-० अशी आघाडी घेतलीये.

भारताला विजयासाठी २२ रन्सची गरज होती. अजून १५ ओव्हर्स शिल्लक होत्या. केएल राहुल आणि आकिब नबी मैदानावर होते. राहुल २६ रन्सवर तर आकिब नबी १ रनवर खेळत होता. मात्र, त्याचवेळी पावसाने हजेरी लावली. सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा DLS नियमानुसार भारत ४ रन्सन पुढे होता. त्यामुळे सामना पूर्ण न होताही भारताला विजय मिळाला.

पावसामुळे ४७ ओव्हर्सचा झाला सामना

या सामन्यात पावसामुळे आधीच दोन्ही संघांना प्रत्येकी ४७ ओव्हरसा खेळ देण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम ४१ ओव्हर्समध्ये १३४ रन्सवर बाद झाला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक रन्स केले. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५५ रन्सची खेळी केली. कर्णधार मिचेल सँटनरने ३१ रन्स केले. इतर एकाही फलंदाजाला १५ रन्सचा टप्पा ओलांडता आला नाही.

भारताकडून गुरनूर बरारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. आकिब नबी, अंशुल कंबोज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट घेत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला.

१३५ रन्सचा लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमछाक

न्यूझीलंडने दिलेलं १३५ रन्सचं लक्ष्य गाठणं भारतीय टीमसाठी कठीण झालं होतं. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज एकामागून एक बाद होत होते. कर्णधार शुभमन गिलला भोपळाही फोडता आला नाही. रोहित शर्माने २३, तर विराट कोहलीने ७ रन्स केले. त्यामुळे अवघ्या ४७ रन्सवर भारताने ४ विकेट्स गमावल्या होत्या.

अशा परिस्थितीत भारताचा विजय कठीण वाटत होता. मात्र केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४३ चेंडूंत ३९ रन्सची पार्टनरशिप केली. त्यानंतर ८६ रन्सवर श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. अय्यरने ४६ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकार मारत ३० रन्स केले.

राहुलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुलने नमन धीरसोबत डाव पुढे नेला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी २८ चेंडूंत २२ रन्स केले. मात्र १०८ रन्सवर नमन धीर बाद झाला. त्याने १६ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १२ रन्स केले. यानंतर १११ रन्सवर अंशुल कंबोजही १ रन करून बाद झाला. त्यानंतर आकिब नबी फलंदाजीसाठी मैदानात आला. राहुल आणि आकिब यांनी मिळून भारताच स्कोर ११३ पर्यंत पोहोचवला. त्याचवेळी पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवावा लागला.

न्यूझीलंडकडून काइल जेमिसन आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर मॅथ्यू फिशरला १ विकेट मिळाली. अखेर पावसामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला. DLS नियमानुसार ४ धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये २-० अशी आघाडी घेतली. सिरीजमधील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना १० नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळवर सरकारी संचालक नेमणुकीचा अध्यादेश का काढला? CM फडणवीसांनी सांगितली कारणं|VIDEO

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप; मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश काढला, २००० कोटी मंजूर

Mahayuti Rift: महायुतीत पुन्हा ठिणगी! स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना-भाजप आमनेसामने

Maharashtra News Live Update: दिवाळीत विक्रीसाठी आणलेले पिस्तूल पोलिसांनी पकडले मुंब्रा ते कुर्ला कनेक्शन उघड

Diwali Holidays: सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्ट्या|VIDEO

SCROLL FOR NEXT