India Bangladesh Tour Postponed: saam Tv
Sports

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

India Bangladesh Tour Postponed: भारत आणि बांगला देश दरम्यान पुढील महिन्यात एकदिवशीय आणि टी२० मालिका खेळली जाणार होती. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार, बासीसीआयनं हा दौरा रद्द केलाय.

Bharat Jadhav

भारतीय संघ आता बांगलादेश दौऱ्यावर जाणार नाही. ऑगस्ट २०२५ मध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये क्रिकेट सामन्यांची मालिका होणार होती. यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार होते, परंतु आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाचा हा दौरा रद्द केलाय. बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही मालिका नंतर खेळवली जाणार आहे. या मालिकेच्या नवीन तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

टीम इंडियाचा बांगलादेश दौरा रद्द

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतलाय. बीसीसीआयने मीडिया अॅडव्हायझरी जारी करून याची माहिती दिलीय. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिका पूर्ण वर्षासाठी पुढे ढकलण्यात आलीय. ही मालिका आधी ऑगस्ट २०२५ मध्ये होणार होती, जी आता सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आलीय.

बांगलादेश दौरा का रद्द झाला?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही मालिका रद्द होण्यामागील कारण दोन्ही संघांचे व्यस्त वेळापत्रक असल्याचे सांगितले जाते. पण दोन्ही देशांमधील संबंध हे देखील ही मालिका पुढे ढकलण्याचे कारण असू शकतात. बीसीसीआयने दुसरे कोणतेही कारण उघड करण्यात आले नाहीये.

दरम्यान टीम इंडिया अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय भारत इंग्लंडमध्ये कसोट सामने खेळत आहे. विराट आणि रोहित शर्मा यांनी कसोटी तसेच टी-२० मधून निवृत्ती घेतलीय. पण विराट-रोहितचे चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी बांगलादेश मालिकेची वाट पाहत होते. पण आता ही मालिका देखील रद्द करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT