Asia Cup 2025 Saam tv
Sports

Asia Cup 2025: भारताचा पाकिस्तानला तब्बल 1,000,000,000 रुपयांचा झटका; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Asia Cup 2025 update : भारताने पाकिस्तानला तब्बल १०० कोटी रुपयांचा झटका दिला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Vishal Gangurde

भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानला धूळ चारत स्पर्धा जिंकली

बीसीसीआयची स्पर्धेतून १०९ कोटींची कमाई

पाकिस्तानला या कमाईचा मोठा आर्थिक झटका

आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. टीम इंडिया या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. तर पाकिस्तानने या स्पर्धेत तीन सामने गमावले. आशिया कप स्पर्धेत चॅम्पियन ठरल्यानंतरही भारताला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाला (BCCI) या स्पर्धेमुळे मोठा फायदा झाला आहे. या स्पर्धेमुळे तब्बल १०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. बीसीसीआयच्या या कमाईचा पाकिस्तानला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे.

संयुक्त अरब अमिरातीत (UAE) झालेल्या या आशिया कप स्पर्धेत बीसीसीआयने जबरदस्त कमाई केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय टूरमुळे भारताच्या बोर्डाला जवळपास १०९.४ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ही कमाई होस्टिंग फी, टीव्ही राइट्स आणि आयसीसी T20I वर्ल्डकपमध्ये सहभाग नोंदवल्याने झाली आहे. मीडिया राइट्समुळे बोर्डाला १३८.६४ कोटी रुपये मिळाले आहेत. पाकिस्तानच्या विरोधात भारताचे ३ सामने झाले. या तिन्ही सामन्यामुळे चांगली कमाई झाली.

रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय २०२५-२६ च्या वार्षिक बजेटनुसार बोर्डाला या वर्षी ६७०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. इंडियन प्रीमीयर लीगचे (IPL) मूल्य सलग दुसऱ्या वर्षी घसरलं आहे. तरीही बीसीसीआयची आर्थिक स्थिती चांगली आहे.

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची कमाई दरवर्षी वाढत आहे. परंतु आयपीएलमुळे मोठं नुकसान होत आहे. रिपोर्ट्सनुसार, २०२५ साली आयपीएलचं मूल्य ७६,१०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. ते मागील वर्षीच्या तुलनेत फार कमी आहे. मागील वर्षी मूल्य हे ८२७०० कोटी रुपये होतं. बीसीसीआयला ६६०० कोटी रुपयांचं नुकसान झालं.

आशिया कप जिंकल्यानंतर भारताला ट्रॉफी मिळाली नाही. आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्यामुळे आशिया स्पर्धेची ट्रॉफी ही एका कार्यालयात बंद आहे. परंतु मोहसिन नकवी आशिया कप स्पर्धेमुळे बीसीसीआयला होणारी कमाई रोखू शकले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

SCROLL FOR NEXT